साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
विश्वास संपादन करून सामाजिक कार्य करीत राहणे हाच खरा धर्म आणि खरी तप साधना आहे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते फैजपूर येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञता महोत्सवात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.रक्षा खडसे, माजी आमदार रमेश चौधरी, अरुण पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटक दिलीप पाटील, शरद महाजन, रवींद्र महाराज हरणे यांनी उपस्थित राहून मनोगतात संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सहकार क्षेत्रात गेली ३० वर्षे यशस्वीपणे कार्य करीत असल्याबाबत चेअरमन नरेंद्र नारखेडे यांचा सर्व साधू संत व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संत रवींद्र महाराज हरणे, सुरेशराज शास्त्री, दुर्गादास महाराज नेहते, धनराज महाराज अंजालेकर, भरत महाराज म्हैसवडीकर, भरतदास महाराज कुसुंबा, पवनदास महाराज, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटक दिलीप पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी राजकीय क्षेत्रातील हिरालाल चौधरी, शरद महाजन, नारायण चौधरी, सभापती हर्षल पाटील, विलास चौधरी, नितीन राणे, पांडुरंग सराफ, भास्कर चौधरी, पंडित कोल्हे, भागवत पाटील, उल्हास चौधरी, संजीव महाजन, नितीन चौधरी यांचा संस्थेचे व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, विजय परदेशी, निळकंठ सराफ, सुरेश परदेशी, खेमचंद नेहते, गणेश चौधरी, अप्पा चौधरी, लतिका बोंडे, रेवती पाटील, भास्कर बोंडे, आर. पी. झोपे, कमलाकर भंगाळे यांनी सत्कार केला. यावेळी संस्थेचे संस्थापक पंडित कोल्हे, व्यवस्थापक जयश्री चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला यावल, रावेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी किरण चौधरी, शेखर चौधरी, काशिनाथ वारके, राजेंद्र मानेकर, मनोज वायकोळे, राजू मिस्त्री, भूषण नारखेडे, सुनील नारखेडे, विलास नेमाडे, मयूर चौधरी, तुकाराम बोरोले, नितीन बोरोले यांनी परिश्रम घेतले. शेवटी रोहिणी भारंबे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रास्ताविक चेअरमन नरेंद्र नारखेडे, सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र राजपूत तर आभार व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी मानले.