दीड ब्रासची अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

0
3

साईमत, यावल : प्रतिनिधी

दीड ब्रासची अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सुसाट वेगाने पळून जात असताना यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी सिनेस्टाईल पद्धतीने हिंगोणा येथे पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले. दरम्यान, यावल शहरात दिवसा, रात्री बे-रात्री, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी दैनंदिन कामकाजात व्यस्त असतात. यावल शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहे. मात्र, दुसरीकडे अवैध गौण खनिजची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिजची वाहतूक करणारे डंपर (क्र. एमएच ३१ सीक्यू ७९१४) तालुक्यातील हिंगोणा येथे पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले. ही कारवाई यावलचे तलाठी ईश्‍वर कोळी, डोंगर कठोराचे तलाठी वसीम तडवी, साकळीचे तलाठी मिलिंद कुरकुरे यांनी अवैध वाळू वाहतुकीचे डंपर सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून पकडले. हे वाहन किरण वसंत बादशह यांच्या मालकीचे आहे. त्यात दीड ब्रासची वाळू आढळून आली. त्यानंतर पंचनामा करून पुढील दंडात्मक कार्यवाही महसूल विभागाच्या पथकाकडून उशिरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here