साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज येथे संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद व्ही. बिल्दीकर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस. खापर्डे, प्रा. ए. आर. मगर, उत्सव समिती प्रमुख प्रा.अंकुश जाधव, प्रा. नयना पाटील, प्रा. दीपक पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजास दिलेला स्वच्छतेचा मंत्र तसेच त्यांनी त्यांचे विचार, संस्कृती…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील महात्मा फुले हायस्कुल शाळेचे माजी विद्यार्थी तथा मुंबई येथील वसई रस्त्यावरील जी.जे.वर्तक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पवार यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शाळेची नुकतीच भेट घेतली. याप्रसंगी माजी विद्यार्थी अशोक पवार यांनी शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. धरणगावला एका कार्यक्रमानिमित्त आल्यावर माझी शाळा महात्मा फुले हायस्कुलला भेट द्यावी, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. भेटीत त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांच्याशी हितगुज साधून विस्तृत चर्चा केली. मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी माजी विद्यार्थी तथा मुख्याध्यापक अशोक पवार आणि केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. १९८४ चा दहावीच्या बॅचमेटचा प्रतिनिधी म्हणून आज शाळेला सदिच्छा…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी कृषी महामंडळ अथवा जळगाव जिल्हा दूध संघात नोकरी लाऊन देण्याच्या आमिषातून तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला मुक्ताईनगर पोलिसांनी अमरावती येथून ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक सचिन वानखेडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले. सविस्तर असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी असलेल्या फकीरा अर्जुन सावकारे (वय २५) या तरूणाने अलीकडेच मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार, संबंधित तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी…
साईमत, रावेर : प्रतिनिधी येथील पोलीस स्टेशनला सिनियर पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पद रिक्त असल्याने सह पोलीस निरीक्षक सतीष अडसुर यांच्याकडे प्रभारी चार्ज होता. जिल्ह्यात सर्वात सिनियर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी अखेर पदभार घेतला आहे. अनेक दिवसांपासून रावेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कोण येणार? त्याची चर्चा आणि उत्सुकता लागून होती. मागील अडीच महिन्यांपासून येथील पद रिक्त असल्याने सहायक पोलीस निरीक्षक सतिष अडसुर प्रभारी अधिकारी म्हणून रावेर पोलीस स्टेशनचा कारभार पाहत होते. अखेर सिनियर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. श्री.ठाकुर यांची तब्बल ३१ वर्ष सेवा झाली आहे. जळगाव…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्याविरुद्ध जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या न्यायालयात अपील अर्ज क्रमांक ५/२०२३ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार सरपंच पद अपात्र करणे संदर्भात अर्ज केला होता. अपील अर्जात ६ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक आयुक्त यांनी निकाल पारित करून सरपंच पद पुढील काळासाठी अपात्र केले होते. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत बाजू मांडण्यात आली. त्यानुसार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. न्यायालयाचे आभार मानतो, असे अक्षयकुमार जैस्वाल यांनी सांगितले. निर्णयाविरोधात कायद्याच्या नियमानुसार जैस्वाल यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्टस्, एस.एम.ए. सायन्स, के.के.सी.कॉमर्स कॉलेज यांनी चाळीसगाव तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये जाऊन त्याठिकाणी संगणक साक्षरता (आय.टी.दिंडी) उपक्रम राबविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी आय.टी.दिंडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करुन मार्गदर्शन केले. यावेळी ए.बी.मुलींचे हायस्कुलचे चेअरमन प्रदीप अहिरराव, उपप्राचार्य डॉ.अजय काटे, उपप्राचार्य प्रा. धनंजय वसईकर, आय.टी.दिंडी प्रमुख प्रा. दीपक आवटे, डॉ.योगिनी वाघ उपस्थित होते. आय.टी.दिंडीचा उद्देश स्पष्ट करतांना जास्तीत जास्त तरुण मुलांनी संगणक शिकून इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. तसेच सोशल मीडिया आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार करतांना आपण काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. अन्यथा सायबर क्राईमसारखे गुन्हे आपल्या हातून होऊ शकतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एम.व्ही. बिल्दीकर यांनी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतर्फे कळमसरे गाव ‘विमा ग्राम’ म्हणून घोषित करण्यात आले. याबाबत शाखाधिकारी गोपाल सोलंकी, उपशाखाधिकारी सुमितकुमार, विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांना अमळनेर एलआयसीतर्फे ७५ हजार रुपयाचा धनादेश गावाच्या विकास कामासाठी देण्यात आला. विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी या आर्थिक वर्षात गावातील ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात विमा कवच देऊन सुरक्षित केले. त्याबद्दल बक्षीस म्हणून येथील ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी सोलंकी म्हणाले की, एलआयसी ही सामाजिक बांधिलकी जोपासते. म्हणूनच अमळनेर येथील गतिमंद आणि मूकबधीर विद्यालयाला मुलांना ये-जा करण्यासाठी सुमारे २५ लाखांची गाडी भेट…
साईमत, रावेर : प्रतिनिधी रावेर-रसलपूर दरम्यान जुगार खेळणाऱ्या पत्याच्या क्लबवर उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने छापा टाकत १३ जणांना जुगार खेळतांना अटक केली आहे. पोलिसांचा छापा पडल्यामुळे बहुतांश जुगाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. छाप्यात पाच लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे जुगार, सट्ट्यासह पत्ते खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांना रावेर ते रसलपूर रस्त्यावर एका घरात झन्ना मन्ना म्हणजे जुगार खेळण्याचा पत्ता क्लब सुरु असल्याची माहिती मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे आयपीएस श्रीमती सिंग यांनी स्वता:च्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस कर्मचारी अनिल इंगळे, सुमित बाविस्कर यांना छापा…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी फैजपूर येथील नरेंद्र विष्णु नारखेडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी तेजस धनंजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावल येथे गुरुवारी, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खरेदी विक्री संघाच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत यावल खरेदी विक्री शेतकरी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी नरेंद्र विष्णु नारखेडे यांचा तर व्हाईस चेअरमनपदासाठी तेजस धंनजय पाटील यांचे दोघांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बैठकीला नवनिर्वाचित संचालक नारायण शशीकांत चौधरी, तुषार…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, नाट्य कलावंत, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. व. पु. होले हे ग्रेट टिचर आहेत. त्यांचे विविध क्षेत्रातील समाजोपयोगी कार्य, दातृत्च भाव सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ गुरुवारी, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर कुलगुरू माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे नामकरण आता ‘व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय’ असे झाले. नामकरण फलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी ईश स्तवन, स्वागत गीत सारिका गिरासे, पल्लवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. व्यासपीठावर…