यावल खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नरेंद्र नारखेडे

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी फैजपूर येथील नरेंद्र विष्णु नारखेडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी तेजस धनंजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावल येथे गुरुवारी, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खरेदी विक्री संघाच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत यावल खरेदी विक्री शेतकरी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी नरेंद्र विष्णु नारखेडे यांचा तर व्हाईस चेअरमनपदासाठी तेजस धंनजय पाटील यांचे दोघांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

बैठकीला नवनिर्वाचित संचालक नारायण शशीकांत चौधरी, तुषार सांहूसिंग पाटील(मुन्ना), उमेश रेवा फेगडे, पांडूरंग सराफ, डॉ.नरेंद्र कोल्हे, अतुल भालेराव, सुनील नेवे, आरती शरद महाजन, सागर महाजन, प्रवीण वारके, धनंजय फिरके, नयना चंद्रशेखर चौधरी, प्रशांत लिलाधर चौधरी, हेमराज जगन्नाथ फेगडे उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त चेअरमन नरेंद्र नारखेडे, विरोधी गटातील संचालक अतुल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, कृउबाचे सभापती हर्षल गोविंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेबद्दलची सविस्तर माहिती नवनिर्वाचित संचालकांना दिली.

नुकत्याच यावल खरेदी विक्री संघाच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. यावलच्या तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक नुकतीच पार पडली. त्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुती प्रणित शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केला होता. संपूर्ण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शशिकांत गाजरे यांनी सहकार्य केले.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा स्वागत सत्कार कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, कृउबाचे संचालक राकेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, दहिगावचे उपसरपंच देविदास धांगो पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here