माजी विद्यार्थी मुख्याध्यापक अशोक पवार यांनी धरणगावला सुवर्णमहोत्सवानिमित्त शाळेची घेतली भेट

0
1

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथील महात्मा फुले हायस्कुल शाळेचे माजी विद्यार्थी तथा मुंबई येथील वसई रस्त्यावरील जी.जे.वर्तक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पवार यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शाळेची नुकतीच भेट घेतली. याप्रसंगी माजी विद्यार्थी अशोक पवार यांनी शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

धरणगावला एका कार्यक्रमानिमित्त आल्यावर माझी शाळा महात्मा फुले हायस्कुलला भेट द्यावी, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. भेटीत त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांच्याशी हितगुज साधून विस्तृत चर्चा केली. मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी माजी विद्यार्थी तथा मुख्याध्यापक अशोक पवार आणि केंद्रप्रमुख ज्ञानेश्‍वर माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. १९८४ चा दहावीच्या बॅचमेटचा प्रतिनिधी म्हणून आज शाळेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे. आमचे शाळेवर असलेले प्रेम आणि शाळेमुळेच आम्ही अधिकारी होऊन घडलो. त्यामुळे शाळेला भेट दिल्यामुळे मनस्वी आनंद झाल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक पवार यांनी केले.

यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी अशोक पवार यांना संपूर्ण शाळेचा परिसर दाखविला. शाळेच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली. आम्ही नक्कीच १९८४ चे बॅचमेंट एकत्रित येऊन गेट-टुगेदर कार्यक्रम करण्याचा मानस आहे. आपल्या शाळेसाठी नक्कीच पुढच्या शैक्षणिक वर्षापासून आमच्या बॅचला शाळा डिजिटल करण्यासाठी जे शक्य असेल ते आम्ही शाळेसाठी नक्की करू, असे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here