साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभा निवडणुकीत जवळपास २० मराठा समाजाचे बांधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यासाठी पुढील रणनीती तयार केली आहे. वाशी येथे करोडोंच्या संख्येने धडकलेल्या मराठा समाज बांधवांच्या मोर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगे सोयऱ्यांची अधिसूचना देऊन मराठा समाजाला आश्वासित केले होते की, लवकरात लवकर सगे सोयऱ्यांचा कायदा करून राज्यातील मराठा समाजाला न्याय देऊ असे असताना सरकार मराठा समाजाचा दिशाभूल करत…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या कामांना मंजुरीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आल्या. मात्र, सिंचन विहिरी मंजूर करताना पैसे देवाण-घेवाण झाल्याची चर्चा काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. मग एवढे पैसे जमा होतात, आमचे काय, असे धोरण काही पदाधिकाऱ्यांनी वापरल्यामुळे विहिरींचे काम थांबविण्यात आल्याचे शेतकरी वर्गात चर्चिले जात आहे. सिंचन विहीर प्रकरणात ना. गिरीष महाजन लक्ष घालणार होते. मात्र, आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने त्यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे सिंचन विहिरीची कामे ठप्प झाली आहे. तालुक्यात शेतकऱ्यांवरच अन्याय का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्याला जर सिंचनाचे साधन उपलब्ध असेल…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात कार्यरत ॲड.आशा शिरसाठ-गोरे यांना भारतीय जनता पार्टी प्रणित महिला मोर्चातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘स्त्रीशक्ती सन्मान सोहळा २०२४’ कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ‘सुषमा स्वराज अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे तेली सेना व तिळवण तेली समाजातर्फे आयोजित ‘सन्मान नारीशक्तीचा’ कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तबगार महिला म्हणून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील अनेक मान्यवरांनी तसेच समाज बांधवांनी ॲड.आशा शिरसाठ-गोरे यांचे…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. संपूर्ण सातपुडा पर्वतावरील शेती शिवार आणि गावांवर ‘जलसंकट’ ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. धानोरा परिसर तसा शेती, समुध्दीने नटलेला आहे. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे विहिरी या टप्पा करीत असून संपूर्ण परिसरात ‘जलसंकट’ आल्याचे नजरेस पडत आहे. शेतकरी पिके वाचविण्यासाठी अहोरात्र धडपड करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हांचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. त्याची झळ शेती शिवारातील पिकांनाही तेवढ्याच उष्णतेने जाणवत आहे तर शेतातील विहिरींची पातळीही खोल जात असल्याचे सद्यस्थितीला चित्र दिसत…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ‘एनईपी २०२० : थीम ॲण्ड प्रॉसपेक्टस’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्र नुकतेच उत्साहात घेण्यात आले. चर्चासत्रात जळगाव परिसरातील १८ महाविद्यालयातील २८४ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे कबचौ उमवि, जळगावचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील होते. मार्गदर्शक म्हणून कबचौ उमवि जळगावचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील होते. यावेळी सिनेट सदस्य प्रा. इ. जी.नेहेते, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, समन्वयक डॉ.उमेश फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. विनोद पाटील यांनी २०२०…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी तांत्रिक अडचणीच्या ग्रहणामुळे वरणगाव शहरात १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाणीपुरवठा कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याचाही आरोप होत आहे. याकडे वरणगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वरणगाव शहराला सात किलोमीटर अंतरावरील तापी नदीच्या पात्रातील पाण्याची उचल करून पुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठ्याला वारंवार तांत्रिक अडचणीचे ग्रहण लागत असल्याने शहरवासीयांना १५ दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप केला जात आहे. शहरातील जलवाहिनीला वारंवार लागणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराला…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी इस्लाम धर्मात कलमा, नमाज, रोजा, जकात, हज अशा पाच प्रमुख तत्त्वांचे पालन करण्याचे सांगितले आहे. त्यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजा (उपवास) करतात. रमजाननिमित्त मुस्लिम समाज बांधवांकडून सहावा रोजा पाळण्यात आला. रमजाननिमित्त चाळीसगाव येथील अलीना शेख (वय १२) हिने लागोपाठ तिसऱ्यावर्षी रमजानचे उपवास धरले. नमाज आणि एवढ्या कडक उपवासाबद्दल चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रमजान महिन्यात मोठ्यांसह लहान मुलेही उपवास धरतात. रोजा सोडण्यापूर्वी अलीनाला नवीन कपडे व हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन तिने उपवास सोडला. अलीना शेख ही युवा उद्योजक अर्जंट मोबाईलचे संचालक, पत्रकार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील तरुण आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर दौलत माळी (वय ४३) यांनी दहावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर नोकरीच्या मागे न धावता आई-वडिलांनी केलेली शेतीच आपण पुढे नेऊन त्याच्यातूनच आपली वेगळी ओळख निर्माण करु शकतो. असा त्यांनी निर्धार केला होता. त्यामुळे त्यांची आज आदर्श शेतकरी म्हणून परिसरात ओळख आहे. आता उन्हाळ्यात तब्बल १२ एकर क्षेत्रात टरबुजाचे उत्पादन ते घेत आहेत. त्या माध्यमातून ते लाखो रुपयेही कमावत आहेत. आता सध्या टरबुजाचे भाव अकरा रुपये किलो आहेत. त्यांचे शेतीवरचे नितांत प्रेम पाहून आणि विक्रमी टमाट्याचे पीक घेत असल्याने त्यांना लोक प्रेमाने ‘टमाटे नाना’ असेही म्हणतात, असे ते आवर्जुन सांगतात. उन्हाळ्यात यशस्वी…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी पिंपरूड शिवारातील आकाश लक्ष हॉटेल समोरील चावदस सराफ यांच्या शेतातील बटाईने लुमदास सराफ यांनी केलेल्या कापणीस आलेला गहू व कडबा चाऱ्याचा गुड शेत बांधावरील महावितरणच्या लोंबकळत असलेल्या तारा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा मदतीसाठी आक्रोश होत आहे. घटनास्थळी गेल्या चार-पाच दिवसापासूनच लोंबलेल्या विजेच्या तारांमुळे मोठ्या प्रमाणात शॉटसर्किट होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने महावितरणच्या कार्यालयामध्ये देऊनही ट्री कटिंगकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अप्रिय घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितलेे. याप्रसंगी पिंपरुडचे पोलीस पाटील हरीश चौधरी, तुषार चौधरी, माजी पोलीस पाटील ज्ञानदेव चौधरी, माजी सरपंच डोंगर चौधरी, लीलाधर चौधरी, ललित चौधरी यांच्यासह येथील ग्रामस्थांनी आग…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका ह्या कणा आहेत. त्यांच्यामुळेच आरोग्य यंत्रणेला कामकाज करणे सुलभ झाले आहे. आशा स्वयंसेविका यांनी भ्रूणहत्येबाबत जागृत राहून ‘मुलगी वाचवा देश वाचवा’ मोहिमेत सक्रियपणे काम करावे. त्यात कोणतीही अडचण आल्यास आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभाग तालुका जामनेर, जामनेर वैद्यकीय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने ग्रामीण भागात तळागाळात कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आशा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, पत्रकार मोहन सारस्वत, आयएमएचे डॉ. संदीप…