साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
इस्लाम धर्मात कलमा, नमाज, रोजा, जकात, हज अशा पाच प्रमुख तत्त्वांचे पालन करण्याचे सांगितले आहे. त्यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजा (उपवास) करतात. रमजाननिमित्त मुस्लिम समाज बांधवांकडून सहावा रोजा पाळण्यात आला. रमजाननिमित्त चाळीसगाव येथील अलीना शेख (वय १२) हिने लागोपाठ तिसऱ्यावर्षी रमजानचे उपवास धरले. नमाज आणि एवढ्या कडक उपवासाबद्दल चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रमजान महिन्यात मोठ्यांसह लहान मुलेही उपवास धरतात. रोजा सोडण्यापूर्वी अलीनाला नवीन कपडे व हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन तिने उपवास सोडला. अलीना शेख ही युवा उद्योजक अर्जंट मोबाईलचे संचालक, पत्रकार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष तनवीर शेख यांची मुलगी आहे.