लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास २० मराठा बांधव उमेदवारी करणार

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभा निवडणुकीत जवळपास २० मराठा समाजाचे बांधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यासाठी पुढील रणनीती तयार केली आहे.

वाशी येथे करोडोंच्या संख्येने धडकलेल्या मराठा समाज बांधवांच्या मोर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगे सोयऱ्यांची अधिसूचना देऊन मराठा समाजाला आश्‍वासित केले होते की, लवकरात लवकर सगे सोयऱ्यांचा कायदा करून राज्यातील मराठा समाजाला न्याय देऊ असे असताना सरकार मराठा समाजाचा दिशाभूल करत दहा टक्के आरक्षण लागू केले आहे. मात्र, ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्यामुळे राज्यात जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे.

जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक नियोजन मराठा समाजातील दानशूर व्यक्तींकडून घेण्यात येणार आहे. ज्यांना सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी सहकार्य करावे, चाळीसगाव शहर व तालुक्यातून ज्या मराठा समाजाच्या बांधवांना जळगाव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करायची आहे. त्यांनी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटीच्या समन्वयक भाऊसाहेब सोमवंशी (मो.९८५०६७६६१६), गणेश पवार (मो.९८२२७४१४२६), सुधीर पाटील (मो.७०२०७६६३६६), खुशाल बिडे (मो.९८८१७६९८२४) यांच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्यात यावा, असे आवाहन केले आहे.

बैठकीला गणेश पवार, भाऊसाहेब सोमवंशी, तमाल देशमुख, खुशाल बिडे, सुधीर पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, खुशाल पाटील, सुदर्शन देशमुख, राजेंद्र पाटील, स्वप्निल गायकवाड, मुकुंद पवार, भरत नवले, विनोद जाधव, सतीश पवार, दीपक देशमुख, छोटू अहिरे, कैलास देशमुख, समर्थ भोसले, पवन पाटील, स्वप्निल गायकवाड, नंदकिशोर पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here