नाहाटा महाविद्यालयात एक दिवसीय चर्चासत्र उत्साहात

0
4

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येथील कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ‘एनईपी २०२० : थीम ॲण्ड प्रॉसपेक्टस’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्र नुकतेच उत्साहात घेण्यात आले. चर्चासत्रात जळगाव परिसरातील १८ महाविद्यालयातील २८४ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे कबचौ उमवि, जळगावचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील होते. मार्गदर्शक म्हणून कबचौ उमवि जळगावचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील होते. यावेळी सिनेट सदस्य प्रा. इ. जी.नेहेते, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, समन्वयक डॉ.उमेश फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी डॉ. विनोद पाटील यांनी २०२० बद्दल शासनाच्या भूमिकेबरोबर विद्यापीठाची भूमिका मांडली. आपल्या विद्यापीठात शासनाने दिलेल्या गाईडलाईनुसार कार्य सुरु आहे. त्यानुसार क्रेडिट आणि कोर्स यांच्या जोडणीचे काम जवळजवळ संपलेले आहे. कार्यभारावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यभागाची काळजी विद्यापीठाने घेतली आहे. त्यानंतर चर्चासत्राचे मार्गदर्शक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले की, बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. त्यानुसार उच्च शिक्षणातही कसे बदल होत गेले त्याचा आढावा घेतला. त्यांनी २०२० बदलद्वारे त्यातील बारकाव्यांचा तपशीलवार विचार मांडला. त्यात लोकल टु ग्लोबल, प्रोजेक्ट, इंटर्नशिपबद्दलही माहिती दिली. तसेच त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेबद्दलही आपले विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रश्‍न उत्तर रूपी संवाद साधला.

यशस्वीतेसाठी प्रा. हर्षल पाटील, डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. संगीता भिरूड, प्रा.डॉ.नीलिमा पाटील, डॉ. मनोज जाधव, डॉ.विलास महिरे, प्रा.पूनम महाजन, डॉ. सचिन कोलते, प्रा. एकता बजाज, प्रा. दिगंबर महाजन, प्रा. अर्चना भालेराव यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. बी एच. बऱ्हाटे, सूत्रसंचलन प्रा. डॉ. ममता पाटील तर आभार डॉ. उमेश फेगडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here