Author: Sharad Bhalerao

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने कोतवालास चिरडून ठार केल्याच्या घटनेचा मलकापूर तालुका कोतवाल संघटनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. कोतवालास ठार मारल्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियावर कारवाई करा, अशा आशयाची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ग्राम कोलद वान येथे १६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार हे तलाठी यांच्यासह अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई करण्यासाठी गेले होते. तेव्हा कोतवाल यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर नेऊन त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा मलकापूर तालुका कोतवाल संघटनेकडून तीव्र निषेध केला आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी आरोपींवर…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील जामनेरपुरा भागातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर पंचायत समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, लॉर्ड गणेशा स्कुलचे प्राचार्य धनंजय सिंग, ज्ञानगंगा…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असतानाही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बहुसंख्य शेतकरी सभासदांनी मार्च २०२४ अखेर कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना बाहेरून व्याजाचे पैसे काढून सोसायटीचे कर्ज फेडले. सोसायटीच्या सचिवांनी जिवाचे रान करून जास्तीत जास्त वसूली केली. सभासदांना आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत कर्ज मिळेल, असे आश्‍वासन सचिवांनी दिलेले असताना आता बँकेने कर्ज वाटपाच्या धोरणात बदल केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना विकासोमार्फतच कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. बँकेकडूनच शेतकरी सभासदांना कर्ज दिले जाणार असल्याने शेतकरी संभ्रमात सापडला. जिल्हा बँक शाखा बोदवड येथे शेतकरी वणवण फिरत आहे. जिल्ह्यातील २९१ सोसायट्यांमध्ये बोदवड तालुक्यातील २९ संस्था अनिष्ट तफावतीत आहे. म्हणजे…

Read More

साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती निर्माण करणे आवश्‍यक आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदानाचा समान हक्क प्रदान केला आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपला वाटा उचलायला हवा. त्याप्रमाणेच मतदानाबाबत लोकांच्या मनात कर्तव्य भावना निर्माण व्हावी, या हेतूने महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी उपस्थित ३०० विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदार शपथ देऊन देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून निर्भयपणे मतदान करण्याचे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरातील पुरातन श्रीराम मंदिराचे पुजारी यांच्या घरात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे घरात आग लागल्याने धावपळ सुरू झाली. मात्र, रामनवमीनिमित्त उपस्थित युवा भाविकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. आगीत किरकोळ साहित्याचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नगरपरिषदेचा अग्निशामक बंब उशिराने आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन बंब केवळ नावालाच असल्याचा सूर जनतेतून उमटला. सविस्तर असे की, वरणगाव शहरातील पुरातन श्रीराम मंदिर येथे रामनवमीनिमित्त ९ एप्रिलपासून संगीतमय महाशिवपुराण कथा सुरू आहे. १७ एप्रील रोजी दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पुजारी बालकदास बैरागी यांच्या घरात प्रसाद तयार करण्याची तयारी सुरू होती. मात्र, यावेळी स्वयंपाक…

Read More

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची तायक्वांदो खेळाडू तथा इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गौरी कुमावत हिने राष्ट्रीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदविल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमात पहूरच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत आणि आर.टी. लेले हायस्कुलचे क्रीडा शिक्षक अनिल पाटील यांनाही मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जळगाव जिल्हा क्रीडा…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या नवीन पुलाखाली आणि जुन्या पुलाजवळ मंगळवारी, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर फैजपूर उपविभागीय पोलीस आयपीएस महिला अधिकारी अन्नपूर्णासिंग यांनी कारवाई करून एक जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टर यावल पोलिसात जमा केले आहे. त्यामुळे महसूल विभागासह पोलीस दलात, अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावल आणि अंजाळे मंडळात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. अवैध व्यावसायिक संबंधित महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवून अधिकारी, कर्मचारी शासकीय कोणत्या कामात, मीटिंगमध्ये व्यस्त आहे आणि राहणार…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पी.यु. खरे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, पालकांमधून म्हसास येथील योगेश पाटील, विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी अनुजा योगेश पाटील हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील उपशिक्षक आर.के.सुरवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.बी.इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी पी.यु.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भऊरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.ठाकरे होते. यावेळी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस पो.कॉ. ईश्‍वर परदेशी, स्टॅम्प वेंडर भीमराव जाधव, पोलीस पाटील शेखर जाधव, उपसरपंच आकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भारतसिंग पाटील, किशोर गुंजाळ, प्रदीप जाधव, सुधाकर जाधव, अंकुश चव्हाण, नंदन मोरे, अनिल मिस्तरी, नरेश पगारे, योगेश पगारे, बाबुलाल सोनवणे, आनंदा पगारे, दिलीप जाधव, निलेश निकम, पांडुरंग गुंजाळ, प्रवीण जाधव, बापू पगारे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भीम एकता मित्र…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश संपादन करुन कर सहायकपदी नियुक्ती मिळविण्याचे गरीमा पाटीलचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना-उबाठाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी काढले. त्या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. पाचोरा येथील गरीमा निकित पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तिची कर सहायकपदी नियुक्ती केली आहे. पाचोऱ्याचा लौकीक उंचाविणाऱ्या कर्तबगार कन्येचा वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना-उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार केला. याप्रसंगी गरिमाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन तिच्या यशाचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, अरूण पाटील, पप्पू राजपूत, अभिषेक खंडेलवाल, राजू काळे, संदीप शिसोदिया, विनोद राऊळ,…

Read More