साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील जामनेरपुरा भागातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर पंचायत समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, लॉर्ड गणेशा स्कुलचे प्राचार्य धनंजय सिंग, ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे, बोहरा सेंट्रल स्कुलच्या प्राचार्या श्रीदेवी नायर, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.हरीश शेळके, कार्याध्यक्ष सचिन महाजन, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.असिफ खान आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सहा शाळांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहा उत्कृष्ट शाळांमध्ये इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कुल, पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कुल, जिकरा इंग्लिश मीडियम स्कुल, बोहरा सेंट्रल स्कुल यांचा समावेश आहे. तसेच शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आठ खेळाडूंचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळांडूमध्ये सिमरा आसिफ खान (रायफल शूटिंग), गौरी विजय कुमावत (तायक्वांदो), श्रद्धा श्रीराम शिंदे (डॉजबॉल), मिताली गोपाल मिस्तरी (डॉजबॉल), सोहम विलास जाधव (डॉजबॉल), पंकज प्रवीण गव्हांडे (डॉजबॉल), विनायक परमेश्वर सपकाळे (डॉजबॉल) यांचा समावेश आहे. शालेय स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून कार्य केल्याबद्दल ५१ क्रीडा शिक्षकांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वार्षिक पारितोषिक समारंभ सन्मानचिन्ह सौजन्य जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ. आसिफ खान यांच्यातर्फे देण्यात आले.
यशस्वीतेसाठी जी.सी.पाटील, डी.के.चौधरी, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, आनंद मोरे, शाहिद शेख, जहीर खान, देवा पाटील, वसीम शेख, आसिफ शेख, गजानन कचरे आदी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व्ही.एन.पाटील, सूत्रसंचालन डॉ.आसिफ खान तर आभार प्रा.समीर घोडेस्वार यांनी मानले.