भऊरला विविध उपक्रम राबवून महामानवाची जयंती साजरी

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भऊरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.ठाकरे होते. यावेळी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस पो.कॉ. ईश्‍वर परदेशी, स्टॅम्प वेंडर भीमराव जाधव, पोलीस पाटील शेखर जाधव, उपसरपंच आकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भारतसिंग पाटील, किशोर गुंजाळ, प्रदीप जाधव, सुधाकर जाधव, अंकुश चव्हाण, नंदन मोरे, अनिल मिस्तरी, नरेश पगारे, योगेश पगारे, बाबुलाल सोनवणे, आनंदा पगारे, दिलीप जाधव, निलेश निकम, पांडुरंग गुंजाळ, प्रवीण जाधव, बापू पगारे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भीम एकता मित्र मंडळाच्यावतीने जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या स्पर्धकांना बक्षीसासह संविधानाचे वाटप करण्यात आले. सर्व स्पर्धकांना भीमराव नारायण जाधव आणि अजय भगवान जाधव यांनी २१ ट्रॉफी बक्षीस म्हणून दिल्या.

वक्तृत्व स्पर्धेसाठी भऊरचे पोलीस पाटील शेखर जाधव, निबंध स्पर्धेसाठी सिद्धार्थ पगारे, सामान्यज्ञान स्पर्धेसाठी सतीश सोनवणे, रंगभरण स्पर्धेसाठी सूर्यकांत जाधव, रांगोळी स्पर्धेसाठी विलास जाधव अशा सर्वांच्यावतीने प्रत्येकी संविधान आणि ट्रॉफी असे बक्षीस ठेवण्यात आली होती. तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी सागर पगारे, निबंध व सामान्यज्ञान स्पर्धेसाठी श्री.ठाकरे, रंगभरण आणि रांगोळी स्पर्धेसाठी गिरणा विद्या प्रसारक मंडळाचे कलेचे शिक्षक सादिक शेख यांनी परीक्षेचे मूल्यमापन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वाटपही करण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भीम एकता मित्र मंडळाच्यावतीने पदकाचे वाटप करण्यात आले.

यशस्वीतेसाठी आर्यन अहिरे, राहुल पगारे, रोहित झीरे, पंकज जाधव, श्रावण पगारे, दादा सोनवणे, रोहित अहिरे, भीम सोनवणे, योगेश सावळे, प्रदीप जाधव, वीरेंद्र केदार, पवन पगारे, सुनील पगारे, गोरख जाधव, कृष्णा जाधव, धर्मराज जाधव, जय पगारे, रोहित पगारे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सागर पगारे तर आभार रायबा जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here