साईमत, जळगाव : प्रतिनिधी फैजपुर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील २६ विद्यार्थी कॉपी केस मध्ये पकडले गेले . या घटनेला बारा दिवस उलटले तरी विद्यापीठाने संबंधितांवर कारवाई केली नाही. विद्यापीठाच्या एका परीक्षा केंद्रावर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी केस घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. फैजपूर येथील तापी परिसर संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात २८ ऑगस्ट रोजी एफ वाय बी फॉर्म तसेच एफ वाय एम फॉर्म या वर्गाच्या प्रथम सेमिस्टर परीक्षेत विदयापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने एफ वाय बी फार्मचे २६ विद्यार्थ्यांपैकी…
Author: Saimat
साईमत, पुणे : प्रतिनिधी राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह २९ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा या गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा येथे बहिणाबाई स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना स्मारकाचे काम पूर्ण होण्याची मागणी करणारे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांच्या सातत्याच्या मागणीनंतर दीर्घकाळाने शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र हा निधी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नसावा, जाहीर केलेला निधी जर आला नाही, तर काम पुढे होणार नाही. यामुळे निधीचा विनियोग होवून काम पूर्णत्वाकडे कसे जाईल याकडे निधी जाहीर करणाऱ्यांनी लक्ष देणे…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील आयएमए व डिस्ट्रिक्ट वुमन्स डॉक्टर विंग्स तर्फे आयएमए हॉल येथे “रिलेशनशिप ऑनलाइन टू ऑफलाइन” या विषयावर एक दिवसीय सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, कोषागार डॉ. स्नेहल फेगडे, अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, मानद सचिव डॉ. तुषार बेंडाळे, (ऑर्गनायझिंग चेअरमन) कार्याध्यक्ष डॉ.अनिता भोळे, कार्यसचिव डॉ.सारिका पाटील, वूमन डॉक्टरविंगच्या महाराष्ट्रराज्य अध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. महिला डॉक्टर सक्षमीकरणा निमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉ.अनिता भोळे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वूमन डॉक्टर विंग याविषयी माहिती दिली. ‘निसर्गाकडे चला’ या विषयावर डॉ.रंजना बोरसे…
साईमत जळगाव प्रतिनिधी ज्या देशांमध्ये पेटंट अधिक असते. त्या देशांचे सकल देशातंर्गत उत्पादन (जीडीपी) जास्त असते. त्यामुळे भारताचा प्रवास विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होण्यासाठी पेटंटवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विगो लायब्ररी फाउंडेशनचे संस्थापक निलेश पावसकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बौध्दिक संपदा अधिकार कक्ष, रसायनशास्त्र प्रशाळा आणि वेगो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी ”पेटंट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पावसकर बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद…
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव या शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पारधी येथील महागणपती या धार्मिक स्थळास भेट दिली तर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पद्मालय या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संत मुक्ताबाई मंदिर कोथळी, संत चांगदेव मंदिर चांगदेव तसेच हतनुर धरण या ठिकाणी सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संत परंपरा, भौगोलिक वारसा तसेच ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घडवून दिले. तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गांधी तीर्थ या जैन व्हॅली येथे असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे आयोजन करून महात्मा गांधी यांच्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यात तीन सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रेची अंमळनेर तालुक्यापासून सुरुवात झाली दिनांक 8 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर भुसावळ मार्गे नशिराबाद येथे जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जनसंवाद यात्रेचे फटाक्यांची आतिष बाजी करून ढोल ताशांच्या गजरात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी जनतेच्या मनातील समस्या व प्रश्न जाणून घेतले व जनसंवाद यात्रेचे…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी फैजपुर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थी कॉपी केस मध्ये पकडले गेल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्रथम सत्राची परीक्षा २४ ऑगस्ट पासून घेण्यात येत आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने कॉपी केस केली, पण नेमकी काय कारवाई केली, हे जाहीर केले नाही. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे.तथापि, विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे. फैजपूर येथील तापी परिसर संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात एफ वाय बी फॉर्म तसेच एफ वाय एम फॉर्म या वर्गाची प्रथम सेमिस्टर परीक्षा घेण्यात येत आहे.…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ िंशदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या कार्य व्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी होणारा २६ ऑगस्टचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता. त्यानंतर हा दौरा नऊ सप्टेंबरला होईल, असे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यात पुन्हा बदल झाला असून, आता हा दौरा १२ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. नऊ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनातर्फे राज्यभर शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम घेण्याचे नियोजन…
साईमत, जालना : प्रतिनिधी अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट पालकांना देखील विश्वासात घेतले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना या बाबत निव्ोदन देखील सादर केले आहे. मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळाव्ो, अशी जुनीच मागणी आहे. मात्र शासन या संदर्भात ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे, तर पालकांनीही आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही…