मुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा पुन्हा रद्द, आता १२ सप्टेंबरला येणार

0
19

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ िंशदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या कार्य व्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी होणारा २६ ऑगस्टचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता. त्यानंतर हा दौरा नऊ सप्टेंबरला होईल, असे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यात पुन्हा बदल झाला असून, आता हा दौरा १२ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. नऊ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनातर्फे राज्यभर शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम पाचोरा येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here