माजी शिक्षण मंत्र्यांच्या फैजपूर महाविद्यालयात फार्मसीच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांवर कॉपी केस

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

फैजपुर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थी कॉपी केस मध्ये पकडले गेल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्रथम सत्राची परीक्षा २४ ऑगस्ट पासून घेण्यात येत आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने कॉपी केस केली, पण नेमकी काय कारवाई केली, हे जाहीर केले नाही. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे.तथापि, विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे.
फैजपूर येथील तापी परिसर संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात एफ वाय बी फॉर्म तसेच एफ वाय एम फॉर्म या वर्गाची प्रथम सेमिस्टर परीक्षा घेण्यात येत आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने नेमलेल्या धरणगाव महाविद्यालयातील भरारी पथकाने अचानक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाला भेट दिली. याव्ोळी त्यांना तळमजल्यावरील दोन ब्लॉक मध्ये एफ वाय बी फार्मचे २६ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. तर वरच्या मजल्यावरील एफवाय एम फॉर्म च्या एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. या सर्व विद्यार्थ्यांचे पेपर भरारी पथकाने आपल्या ताब्यात घेतले आहे.

आता विद्यापीठ या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करते? एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी केस झाल्याने याला जबाबदार कोण? वर्गातील सुपरवायझर, वरिष्ठ पर्यव्ोक्षक तसेच विद्यापीठाचे बैठे पथक काय करत होते? असा प्रश्न उपस्थित आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here