आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची घेतली शपथ

0
13

साईमत, जालना : प्रतिनिधी

अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट पालकांना देखील विश्वासात
घेतले आहे.

विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना या बाबत निव्ोदन देखील सादर केले आहे. मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळाव्ो, अशी जुनीच मागणी आहे. मात्र शासन या संदर्भात ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे, तर पालकांनीही आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनाच्या तीव्रतेने मराठा आरक्षण मिळण्याची चिन्हे दिसत असली तरी अजूनही लोकांमध्ये अद्याप आरक्षण न मिळाल्याची खदखद दिसून येत आहे. आता हे लोण शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा दिसून येत असल्याने सरकारला लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक बनले आहे.
दुसरीकडे, मराठा समाजाला आरक्षण मिळाव्ो आणि उपोषणकर्ते मनोज जरंगे यांच्या मागण्या मंजूर कराव्या, या मागणीसाठी आज जालन्यात ॲड. मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळाव्ो, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील ११ दिवसांपासून शांतिपूर्वक पद्धतीने आमरण उपोषण सुरू आहे.

एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
शासन सकारात्मक पावले उचलत असले तरी १० दिवस उलटूनही अद्याप प्रशासनाच्या वतीने कुठलाच ठोस निर्णय झालेला नसल्याने संतप्त झालेल्या मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. याव्ोळी पोलिसांनी व्ोळीच हस्तक्षेप करून त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान तालुका जालना पोलिसांनी ॲड. मारुती वाढेकर यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया जालना तालुका पोलीस ठाण्यात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here