शिंदखेड्यात निवृत्त मुख्याध्यापक देणार मल्लखांबचे धडे

0
2

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी

येथील एम एच एस एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. राजपूत हे माळीवाडयातील संत सावता व्यायाम शाळेत मल्लखांब शिकवणार आहेत.
संत सावता गणेश मंडळ आणि व्यायाम शाळा युवा गणेश मंडळ यांच्या तर्फे मल्लखांबाची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन आणि आखाडा पुजन राज्यस्तरीय मल्लखांब चॅम्पियन गोकुळसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी मुख्याध्यापक आर. डी. राजपूत, एम जे राऊळ, माजी उपनगराध्यक्ष भिला माळी, प्रविण माळी, राजेंद्र माळी, दिपक देशमुख, गजेंद्र भामरे, एन. एस. माळी यांच्यासह व्यायाम शाळेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या मनोगतात राजपूत यांनी दररोज संध्याकाळी दोन तास मुले आणि मल्ल यांना विनामूल्य शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी दिनचर्येत बदल करावा. मोबाईल आणि व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन केले. आभार प्रविण माळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here