Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी पौर्णिमा वुमन्स फाउंडेशन जळगाव तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमत्त रेल्वे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ धम्म पहाट हा भिम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम फाऊंडेशन च्या वतीने त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री. बुध्दाच्या चरणावती….,साऱ्या विश्वाला बुध्द हवा…., पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे ..,किती भीमाच्या सांगाव्या कथा..,दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले ..अशा सुमधुर गीतांनी परिसर प्रसन्न झाला व याच सुमधुर भीम बुद्ध गीतांचा आस्वाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंदन करायला येणाऱ्या अनुयायांनी घेतला . सदर कार्यक्रमात योगेश भालेराव ,कावेरी सूरवाडकर , राजू बेहरे सर , नर्मदा भालेराव , कबीर लांडगे…

Read More

चेन्नई : वृत्तसंस्था आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाने आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद केली. चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ८ विकेटनी विजय मिळवला. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध ६९ धावांनी विजय मिळून खळबळ उडवली होती. तेव्हा तो स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल ठरला होता. त्यानंतर अफगाण संघाने आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद केली. वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. याआधी दोन्ही संघात ७ लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व पाकिस्तानने जिंकल्या होत्या. प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर २८३ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर आणि अफगाणिस्तानचा अनुभव लक्षात घेता ही धावसंख्या आव्हानात्मक होती. पण अफगाणिस्तानचे सलामीवीर तयारीत आले होते.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शना नुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात तरुण कुढापा चौक, जुने जळगाव या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य अभियानात नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर, डोळ्यांची तपासणी आणि शुगर तपासणी करण्यात आली. दिवसभरात १४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. पुढील तीन दिवसात वाल्मिक नगर, शिवाजी नगर तसेच मिल्लत नगर परिसरात हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रूग्णालय जळगांवचे डॉ. रितेश पाटील, डॉ. केयुर चौधरी, डॉ. सतीष…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील मेहरूण परिसरातील रेणूका नगर मधील ४२ वर्षीय इसमाने कौटुंबिक विवंचनेतून छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मेहरूण परिसरातील रेणुका नगरात संतोष वामन भावसार (वय ४२) राहिवासाला होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून – तीन मुलांसहित बेपत्ता आहे. तेव्हापासून ते रेणुका नगरात एकटे राहत होते. प्लम्बिंग काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या विवाहित बहिणी रेणुकानगर परिसरातच राहतात. गेल्या काही दिवसांपासून संतोष हे कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विविध संघटनांनी राज्यभर केलेल्या आंदोलनामुळे शासनाने कंत्राटीकरणाचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे. मात्र तसे परिपत्रक अद्यापही काढलेले नाही.‘दत्तक शाळा योजना, कंपनीकरणातून जिल्हा परिषद व नगरपालिका व महानगरपालिका शाळांचे नियंत्रण व संचालन‘ याविषयी शालेय शिक्षण विभागाने १८ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयासंबंधी शासनाची भूमिका सुस्पष्ट नसल्याने ‘दत्तक शाळा योजना रद्द‘ करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव शहर व तालुका माध्यमिक, प्राथमिक, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक- शिक्षकेतर संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी एस. डी. भिरुड, प्रा. सुनिल गरुड, मगन पाटील, साधना लोखंडे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगु काना ठाकूर महाविद्यालय ( स्वायत्त) न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रताप महाविद्यालयाची ‘तो पाऊस आणि टाफेटा’ प्रथम, माणुसकी मल्टीपर्पज बुलढाणा यांची अनपेक्षित द्वितीय तर सातपुडा सामाजिक व शैक्षणिक संस्था शहादा यांची मॅडम एकांकिका तृतीय क्रमांकाने विजेती ठरली आहे. राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून, ही स्पर्धा महाराष्ट्रभर एकूण नऊ केंद्रांवर प्राथमिक फेरी स्वरूपात घेतली जाते. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्रांवर प्रथम येणाऱ्या संघास सात हजार रुपये रोख व द्वितीय येणाऱ्या संघास…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेतील क्लास १०००० क्लीन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डिव्हायसेस फॅब्रिकेशनच्या ३० तासाचे हाताळणी प्रशिक्षण वर्गाचा समारोप विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रशिक्षणाकरीता पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांनी क्लीन रूम मधील सर्व नियमावली पाळून स्वतः सेमीकंडक्टर वेफरवर MOS डिव्हायसेस बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी समन्वयक प्रा. ए. एम. महाजन यांनी नाविन्यतापूर्ण प्रशिक्षण उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती देऊन आपल्या विद्यापीठात प्रथम प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पार…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश ची आई आदर्श नगर परिसर मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त होम पूजनाचे आयोजन करण्यात आले. सदर पूजन विजय चौधरी , निखिल पाटील, मयूर वाघ, भैय्या चंदन , आदींच्या हस्ते सहकुटुंब होम पूजन करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील एकलव्य क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे (प्रथम) यश अमित हेमनानी, (द्वितीय)आरुष अभय चौधरी, महर्षी सचिन जोशी, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात देशराज कीर्ती मुनोत, यांनी या स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंची विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या अनुशंगाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी विविध पारितोषिके मिळवत सदर स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मीनल थोरात व एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॉश प्रशिक्षक प्रवीण कोळे आदी उपस्थित होते. विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात दि.१७ ते २१ ऑक्टोबर या काळात पाच दिवसीय बिगर हिंदी नवलेखक शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिर हे भारत सरकार संचालित केंद्र केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली आणि मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन दि.१७ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध हिंदी लेखक डॉ.महेंद्र ठाकूरदास यांच्या हस्ते करण्यात आले. यांनतर या पाच दिवसात, धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.योगेश पाटील यांनी निबंध लेखन, रेखाचित्र आणि संस्मरण या विषयावर उपस्थित शिबिरार्थी नवलेखकांना मार्गदर्शन केले. मू.जे.चे माजी हिंदी विभागप्रमुख प्रा.अरुण पाटील यांनी नाटक आणि एकांकिका यांच्या संहिता लेखन विषयावर मार्गदर्शन…

Read More