साईमत जळगाव प्रतिनिधी
दिपोत्सवाच्या दुसर्या दिवशी धनत्रयोदशीनिमित्त डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज धन्वंतरी देवतेचे पूजन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी धन्वंतरीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, निरोगी आरोग्य प्रदान कर, अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील लेखापाल, क्लर्क आदि उपस्थीत होते.