Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले‌ आहे. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा. जळगाव शहर व जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महापालिका आयुक्त व जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदुषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे. बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे…

Read More

साईमत नाशिक प्रतिनिधी महापालिकेला सर्व आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठी नेमकी किती रक्कम आवश्यक आहे, याबाबत प्रशासनातच दुमत आहे. वडाळा व देवळालीचा प्रस्ताव पाठविताना एका प्रस्तावात भूसंपादनाच्या दायित्वाचा भार साडेचार हजार कोटी, तर एका ठिकाणी दायित्वाचा भार चार हजार 700 कोटी रुपये दाखविण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी नेमका किती निधी लागेल, याबाबत प्रशासनातच दुमत आहे. शहरात शाळा, क्रीडांगण, हॉस्पिटल, उद्याने आदीसाठी विकास आराखड्यात आरक्षित जागा महापालिकेच्यावतीने ताब्यात घेताना प्रथम प्राधान्य कमिटीसमोर प्रस्ताव ठेवले जाणार असून निवाडा होऊन मोबदला निश्चित होणार आहे. आरक्षित जागा दहा वर्षांत संपादित करणे अपेक्षित असते.जागा ताब्यात न आल्यास दहा वर्षांनंतर जागामालक नियम 127 अन्वये जागा ताब्यात घेण्यासाठी…

Read More

साईमत पाचोरा  प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजार पेठेसह सर्वच ठिकाणी नागरिकांची दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारपेठ फुलल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यात मातीचे दिवे, पणत्या, आकाश कंदील, रेडीमेड फराळ, किराणा, कपडे खरेदी, इतर वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात स्टेशन रोड जामनेर रोड भडगाव रोड या भागात मोठी गर्दी होतांना दिसत आहे. दिवाळीचा प्रारंभ गुरुवारी रमा एकादशी आणि वासूबारसपासून झाला आहे. ही दिवाळी येत्या बुधवारी, 15 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. दिवाळीला लहान मुलांपासून तरुणाई आणि वयोवृद्धांमध्ये आनंद असतो. पाचोरा शहरात मानसिंगका पटांगणावर फटाक्यांची दुकाने लागली आहे. तेथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. फटाके खरेदी करतांना नागरिकांमध्ये…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी दीपावली निमित्य रोटरी सेंट्रलतर्फे जिल्हा परिषदेच्या जळकातांडा येथील मुलामुलींच्या शाळेत१२१विद्यार्थ्यांना फराळ आणि मिठाईचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी राजेश दोशी ,राजेंद्र पिंपरकर , सतीश अग्रवाल , दीपक नाथानी यांचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष कल्पेश शाह , मानद सचिव दिनेश थोरात , सभासद दीपक नाथानी , कृती शाह , शाळेचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य भंगू चव्हाण ,ज्ञानेश्वर चव्हाण , प्रविण पाटील , मुख्याध्यापिका भारती सोनार , शिक्षिका पूर्णिमा भामरे , वनमाला हतकर उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन दिनेश थोरात तर आभार भारती सोनार यांनी केले.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वायत्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विविध अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच “पीअर टीचर” म्हणजेच हा प्रोग्राम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करते जसे महाविद्यालयात सध्याला शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच प्रॅक्टिकल ज्ञानात अधून मधून भर घालत मार्गदर्शन करणाऱ्या सिनिअर विध्यार्थ्यांना पीअर टीचर्स म्हणतात अशा विध्यार्थ्यांचा शोध घेत या कार्यक्रमात त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी आर.सी.पटेल फार्मसीचे प्राचार्य व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. संजय सुराणा…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अथवा सुरुवातीच्या पहिलया दिवशी गोवत्सद्वादशी अर्थात वसुबारस हा सण सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी गाईची पाडसासह पूजा, अर्चा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवंत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत असल्याने सर्व ठिकाणी पूजा करण्यात आली. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत. त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घातली जाते. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घातला जातो. अशा पद्धतीने शहरासह ग्रामीण भागात रितीरिवाजानुसार वसूबारस सण सर्वत्र साजरा करण्यात आला.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव आणि डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महाविद्यालयात दिवाळी साजरी केली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी महालक्ष्मीचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा केली. याप्रसंगी ते म्हणाले की दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक. विद्यार्थ्यानी नेहमी अद्ययावत राहून नवीन ज्ञान आत्मसात करून दुर्गुणावर मात करू असा संकल्प करायला पाहिजे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ वर्षा पाटील वुमेंस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निलिमा वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थीत होते.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय इसमाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२) हे पत्नी, दोन मुलांसह राहिवासाला आहे. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येत्या ११ व १२ नोव्हेंबर रोजी शनिवार, रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यास जोडूनच दीपावलीच्या काळात १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यानही सुट्ट्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिले आहेत. या शिवाय, महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थाळावर जाऊन view and pay bill वरही ग्राहकांना वीजबिल भरता येईल. महावितरण मोबाईल ॲपसह इतर सर्वच ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना त्यांची वीजदेयके ऑनलाईन भरता येतील.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिवाळी उत्साहा मध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अविनाश धर्माधिकारी, शाळेचे प्राचार्य प्रविण सोनवणे, समन्वयिक संगीता तळेले , स्वातीअहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी हेम पाटील ,पार्थ नारखेडे, ऋषिकेश बारी, पियुष करडे देवेश पाटील देवंश जैस्वाल, श्रुती बराठे,हितांश पाटील अन्वेषा देशपांडे, मिथिलेश वाघ, कृष्णा चौधरी, कुलश्री कुलकर्णी प्रत्यूशा शर्मा, अन्विता सोनवणे, खुशी पुष्पकुमार मुंधरा, लीशा फुलफगर या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्त्व सांगितले. संगीत शिक्षक गणेश देसले तसेच ओजस्विनी देसले या विद्यार्थिनीने दिवाळीचे गीत सादर केले तर इयत्ता चौथीची वैष्णवी…

Read More