तिसऱ्या मजल्यावरून पडून प्रौढाचा जागीच मृत्यू

0
13
तिसऱ्या मजल्यावरून पडून प्रौढाचा जागीच मृत्यू-www.saimatlive.com

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय इसमाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२) हे पत्नी, दोन मुलांसह राहिवासाला आहे. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

मयत उल्हासराव पाटील यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगा हितेश, मुलगी हर्षदा असा परिवार आहे. मुलगी हर्षदाने बीडीएसचे शिक्षण घेतलेले आहे तर, हितेश हा बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here