गोमातेचे पूजन करुन घरोघरी वसूबारस साजरी

0
5
गोमातेचे पूजन करुन घरोघरी वसूबारस साजरी-www.saimatlive.com

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अथवा सुरुवातीच्या पहिलया दिवशी गोवत्सद्वादशी अर्थात वसुबारस हा सण सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी गाईची पाडसासह पूजा, अर्चा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवंत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत असल्याने सर्व ठिकाणी पूजा करण्यात आली.

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत. त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घातली जाते. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घातला जातो. अशा पद्धतीने शहरासह ग्रामीण भागात रितीरिवाजानुसार वसूबारस सण सर्वत्र साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here