Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील आवार गावाने दिवाळी फटाके न फोडता दीपोत्सवाने साजरी केली याचं औचित्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आवार गावचे सरपंच गोकुळ सपकाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित गावकरी यांचा सत्कार करण्यात आला. आवार तालुका जिल्हा जळगाव सारख्या साडेसातशे लोकवस्तीच्या छोट्याशा गावाने दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि एकही फटाका न फोडता दिवाळी साजरी करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला. याच आदर्श कामाबद्दल महा अनिस राज्य कार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग प्रमुख दिगंबर कटारे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविका आणि पुस्तके देऊन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी रेडक्रॉसच्या सिनिअर सिटीझन वेल्फेअर कमिटीमार्फत कळविण्यास आनंद होतो कि दि. १६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत जेष्ठ नागरीक (स्त्री, पुरुष) ज्यांचे वय ६० वर्षाच्या वर आहे अशांना सवलतीच्या दारात फिजिओथेरपीचे उपचार दि. १६ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्या जेष्ठ नागरीकांना आधार कार्ड छायांकित प्रत आणून रेडक्रॉस व्यवस्थापनेकडे फिजिओ थेरपी उपचारासाठी आपली नावे नोंदवावीत. फिजिओ थेरपीसाठी उपलब्ध मशिनरी साहित्याद्वारे व तज्ञ डॉक्टराकडून गुढगे, पाय, कंबर, मान व पाठ दुखी, फ्रोझन शोल्डर व इतर आजारावर फिजिओ थेरपीने उपचार तपासणी करून सुरु करण्यात येईल. जेष्ठ नागरिकांनी आधार कार्ड व आजारासाठी काढलेले त्या भागाचे एक्स रे, फोटो व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय उद्योजक्ता दिना निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन बिझिनेस आयडिया विषयी रिसर्च , इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी ला चालना मिळावी या उद्देशाने ” फिफ्टी का फंडा ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना राम बायोटेक चे एम. डी. पुष्कराज चौधरी यांनी सांगितले कि, ” बिझिनेस करताना अत्यंत महत्वाचे आहे ते इंटिग्रिटी म्हणजे अखंडता पाळणं. त्याच बरोबर उद्योजक म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागते हे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कंपनी राम बायोटेक चा आता पर्यंतचा प्रवास उलगडला. उद्योजक म्हणून शिक्षणा बरोबरच लिसनिंग पॉवर, इमॅजिनेशन, व्हिजुअलाझेशन ची…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बीपीएड प्रथम वर्षाचा खेळाडू निलेश दिलीप माळी याने दिनांक २५ ते २७ ऑक्टोंबर दरम्यान गोवा येथे पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या रग्बी संघात सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष रब्बी संघास रजत पदक प्राप्त झाले. संघातील प्रत्येक खेळाडूस महाराष्ट्र शासनाकडून रुपये पाच लाख एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या यशाबद्दल शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी विभागप्रमुख प्रा.डॉ. निलेश जोशी, प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रा. प्रवीण कोल्हे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील शाहूनगर येथे राहणारा तरुण गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पवन ज्ञानेश्वर विसपुते (वय-२५, रा. शाहूनगर जळगाव) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पवन विसपुते हा आपल्या परिवारासह जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात वास्तव्याला आहे. गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी पवन हा घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. रात्रीपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याची कुठेही माहिती मिळाली नाही, म्हणून अखेर शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून दीपोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी अर्थात धनत्रयोदशीला गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयातील रूग्णांना फराळ वाटप करत जळगाव जिल्हा माहेश्वरी संगठन अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी मारवाडी संघटन जळगाव शाखेने आदर्श निर्माण करत आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. देशातील जनता दिपावली उत्सव साजरा करत असतांना रूग्णांना आजारापणामूळे रूग्णालयातच चिंताग्रस्त वातावरणात दिपावली साजरी करता येत नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी मारवाडी संघटन अंतर्गत जळगाव जिल्हा माहेश्‍वरी मारवाडी संघटनेच्या शाखेने दिपावली निमित्‍त रूग्ण व कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून चिंताग्रस्त वातावरणातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आरोग्यमयी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमती नवाल, सचिव मनिषा तोतला, माजी प्रदेशाध्यक्ष…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अरुणाबाई कॉलेज ऑफ फार्मसी येथे एक सप्ताह कार्यशाळा आयोजीत केली होती. यामध्ये चतुर्थ वर्षातील बी फर्मसीच्या विद्यार्थ्यांनी यूव्ही, एचपीएलसी, जीसी आणि डिसॉल्यूशन अशी उपकरणे हाताळली. फार्मस्युटीकल केमेस्ट्री विभाग वरिलायबल श्री इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून अनिल विसपुते होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी सरस्वतीपुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर अनिल विसपुते यांनी विद्यार्थ्यांना उपकरणांविषयी माहिती दिली. त्यानंतर चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी कुतूहलाने पुर्ण सप्ताहात विविध उपकरणे हाताळली. कार्यशाळेच्या समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वप्नल नारखेडे यांनी केले.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी दिपोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी धनत्रयोदशीनिमित्‍त डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज धन्वंतरी देवतेचे पूजन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धन्वंतरीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, निरोगी आरोग्य प्रदान कर, अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील लेखापाल, क्‍लर्क आदि उपस्थीत होते.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्रातील हिंदी विभागात सन २०२२-२०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्रितिशा गावित व व्दितीय क्रमांकाचा विद्यार्थी निलेश बागुल या दोघांना बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीने गौरविण्यात आले. सन २००६ पासून बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे दरवर्षी हिंदी विभागातील एम. ए. हिंदी विषयात प्रथम व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यास रूपये अकरा हजार व सात हजार पाचशे रोख आणि प्रशिस्तपत्र देवून गौरविण्यात येते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते प्रितिशा गावित व निलेश बागुल या दोघांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. बँकेचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ऐन सणासुदीला महावितरणच्या मक्तेदाराने आपल्या कडील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कंत्राटी कामगार शुक्रवारी उपोषणास बसले होते. दरम्यान, कंत्राटी कामगार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे जाऊन याबाबत जाब विचारत कामगारांना दोन दिवसात कामावर रुजू करण्यास संबंधित एजन्सीना सांगून सांगा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या वतीने उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला आहे. यावेळी मनसे चे उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या सोबत जवळपास ४२ कंत्राटी कामगार उपस्थित होते. त्यात विनोद तायडे, बापू कोळी, राजेंद्र ठाकूर, विशाल ठाकूर, सचिन सपकाळे, धनराज सपके, सचिन सपकाळे, धनराज सपके, संजय कोळी,…

Read More