साईमत जळगाव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर होते. त्यांनी उपस्थित मुलांना केवळ परीक्षार्थी न होता खऱ्या अर्थाने संशोधक, यशस्वी विद्यार्थी, आदर्श नागरिक व्हा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक ए. एन. पाटील यांनी केले. धनश्री रोकडे, अथर्व ब्रह्मक्षत्रिय, प्रणाली नारखेडे, कुणाल पाटील, मानसी खैरनार, सृष्टी महाजन, मानसी पाटील आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने वर्षा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम कोल्हे यांनी केले. तर आभार वेद्प्रकाश् गाडदे यांनी मानले.
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत आयएमआरच्या बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी नीरज चंद्रशेखर जोशी यांचे निवड करण्यात आली आहे. पहिल्याच सामन्यात नीरज जोशी ने नेत्रदीपक कामगिरी करत सामनावीर ठरला. क. ब. चौ. उमवीतर्फे मु.जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडांगणारील सामन्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने कृषी विद्यापीठ नवसारी, सुरत. विद्यापीठावर १२० धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात ३५ धावा काढत. ४ गडी बाद करणारा आयएमआरचा नीरज जोशी हा सामनाविर ठरला. तसेच दिनांक २० फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही कबचौ उमविं संघाने उत्कृष्ट खेळ करत विजय संपादन केला. त्या सामन्यातही निरज ने…
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ आज गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या महाविद्यालयाचे नाव “व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय” असे राहील, अशी माहिती प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यास के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे सहकार्य लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले. ही पत्रकार परिषद बुधवारी दुपारी महाविद्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये झाली. नामकरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.टी.ई. वेस्टर्न रिजनल कमिटी (नवी दिल्ली) चे सदस्य आणि यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहासकुमार आर.पाटील राहतील. प्रा. वसंतराव पुरुषोत्तम होले आणि…
साईमत जळगाव प्रतिनिधी नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २३ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते२३ रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल देसाई, राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाणार आहे. यावेळी खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. एकनाथराव खडसे, आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. चिमणराव पाटील, आ.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात ऑरेंज कलर डे उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ऑरेंज कलरची माहिती देण्यात आली. सर्व शिक्षिका व विद्यार्थी ऑरेंज कलरचे कपडे परिधान करून आले होते. क्राफ्ट पेपर पासून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू तसेच ऑरेंज कलरच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख योगिता कासार होत्या. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रविण सोनावणे, समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले.
साईमत जळगाव प्रतिनिधी इकरा युनानी मेडिकल कॉलेज मधील २०१८ बॅच चे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे BUMS पदवी अभ्यासक्रम पुर्ण केले त्यांची पदवी वितरण समारंभ महाविद्यालयात नुकताच उत्साहात झाला. यावेळी ४९ विद्यार्थ्याना BUMS पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अब्दुल अजीज सालार, अमिनुद्दिन बादलीवाला, नबी दादा बागवान, तारीक अन्वर, रमीज बाद्लीवाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार म्हणाले की, नव्याने पदवी घेतलेल्या डॉक्टरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा, आपण आता पर्यंत करत असलेल्या महेनतीचे फळ आहे, आज तुम्ही समाजात…
साईमत जळगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही तर माणसाला जगण्याचा मंत्र दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले. त्यात त्यांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना करुन गरीब जनतेला न्याय मिळवून दिला. जीवनातील प्रत्येक प्रसंगाना ते धैर्याने समोरे गेले, कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. असे प्रतिपादन बापुराव पानपाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड, पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद बागुल,डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शिवचरित्रातून काय…
साईमत जळगाव प्रतिनिधी माती, पाणी, इतिहास आणी छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वोत्तम संस्कार आहे. अशा स्पर्धा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये मदत करतात असे प्रतिपादन माजी महापौर अश्विन सोनवणे यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भाऊंच्या उद्यानासमोरील परिसरात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २१ शाळांचे ४२ संघ व २३७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत मुलींची लक्षणीय उपस्थिती होती. या स्पर्धेला शाळा व मुलांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे भाऊंच्या उद्यानासमोरील परिसर गजबजलेला होता. दरम्यान, माजी महापौर अश्विन सोनवणे…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “ईगलबाइट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” या आयटी कंपनीमार्फत जावा डेव्हलपर, सिस्टम इंजिनिअर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, एचआर एक्झिक्युटिव्ह, पीएचपी डेव्हलपर इत्यादी पदांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “ईगलबाइट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीचे संचालक ओम काठे, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. यावेळी १३२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर ९० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, ट्रेनिंग अॅण्ड…
साईमत जळगाव प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूर विद्यापीठाच्या ११ व्या पदवीप्रदान समारंभात जळगाव येथील डॉ. मानसी योगेश चौधरी हिला कनुभाई पशुवैद्यकिय सावडीया सूवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. सुवर्ण पदक वेटरनरी पब्लिक हेल्थ (VPH) या विषयात मिळवल्याचे मानसीने वार्तालाप कार्यक्रमात सांगितले. व्हेटरनरी क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुलींना खूप उत्तम संधी असल्याचेही तिने अभिमानाने सांगितले. ११ व्या पदवीदान समारंभात २०२१-२४ या शैक्षणिक वर्षात व्हेटरनरीचे १३४४० पदवीधर, १९९ पदव्युत्तर 30 डॉक्टरेट, एकूण १७६९ जणांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभातील उत्कृष्ट, शैक्षणिक कामगिरीबद्दल ७२ सुवर्णपदके, २३ रोज पदके आणि तीने २५ हजार रुपयांचे तीन रोख पारितोषिक देण्यात आली. व…