रायसोनी महाविद्यालयात ९० विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “ईगलबाइट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” या आयटी कंपनीमार्फत जावा डेव्हलपर, सिस्टम इंजिनिअर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, एचआर एक्झिक्युटिव्ह, पीएचपी डेव्हलपर इत्यादी पदांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “ईगलबाइट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीचे संचालक ओम काठे, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. यावेळी १३२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर ९० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.
यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार, समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणे, विध्यार्थ्यानी व्यवसाय करावा, यासाठी केंद्र कार्य करते. सुरवातीला कंपनीचे संचालक ओम काठे यांनी मुलाखती व निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवून सांगत विविध टप्यात उपस्थित विध्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती घेतल्या.
प्लेसमेंट आसोसीएट डीन प्रा. मनीष महाले यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. करिष्मा चौधरी या विध्यार्थिनीने सूत्रसंचालन केले तसेच हि सर्व प्रक्रिया प्रा.रफिक शेख, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. करिष्मा चौधरी व ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर परिसर मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी अभिनंदन केले़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here