साईमत जळगाव प्रतिनिधी टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सहाजिकपणे त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजच्या काळात मुलांचे संगोपन करताना, त्यांच्यावर संस्कार करताना पालकांच्या समोर नक्की काय आव्हाने आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजे आणि पालक म्हणून आपण कुठे चुकत आहोत, याचे मूल्यमापन करून स्वत:मध्ये बदल घडवला पाहिजे. असे प्रतिपादन नागपूर येथील ज्येष्ठ बाल मानसोपचार तज्ज्ञ तथा लाईफ कोच डॉ. रोझिना राणा यांनी केले. सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे पालकांना मार्गदर्शन करतांना डॉ. रोझिना राणा बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी निमित्त स्वातंत्र्य चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमा प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस मुख्य लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे , मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहा. आयुक्त अभिजीत बाविस्कर, कार्यालय अधीक्षक सुनील गोराणे आदींनी माल्याअर्पण करून आदरांजली वाहिली.
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्रात व राज्यात वरचढ असलेल्या भाजपचे ना. गिरीश महाजनांसह आ. सुरेश भोळे यांनी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात शहर, जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी करावे आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांबद्दल गांभीर्य दाखवून सत्तेतील आपला प्रभावही सिध्द करावा, असे दणकेबाज आव्हान माजी महापौर जयश्री महाजन यांनी दिले. यावेळी त्यांनी आगामी अर्थसंकल्पाकडून शहर, जिल्ह्याला असलेल्या अपेक्षांचाही पाढा त्यांनी पत्रपरिषदेत वाचला. माजी महापौर जयश्री महाजन आ. भोळे व ना. महाजन यांना सडेतोड भाषेत आरसा दाखवत पुढे म्हणाल्या की, विकासकामांच्या दृष्टीने अर्थसंकल्प महत्वाचा असतो. अर्थसंकल्पात विविध खात्याअंतर्गत कामांसाठी तरतूद केली जाते. जळगाव शहराची नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधी म्हणून शहराचे आ. सुरेश भोळे यांचेकडे शहराच्या हितासाठी…
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुका शेती संघाच्या चेअरमन पदी शिवसेनेचे ( शिंदे ) ब्रिजलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादीचे ( पवार गट) अनिल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका शेती संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध झाले होते. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट, शिंदे सेना बीजेपी, बीआरएस यांनी एकत्र येऊन बिनविरोध पॅनल निवडून आणले होते, त्यात शिंदे सेनेचे पाच, शरद पवार गटाचे पाच, भाजपचे तीन व बीआरएसचे दोन असे १५ संचालक निवडून आले होते. चेअरमन निवडीत शिंदे गटाचे बिजलाल पाटील (धानवड) तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल पाटील ( ममुराबाद ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोवा येथील ६ वी नॅशनल मास्टर गेम – २०२४ मध्ये अॅक्वा स्पा कोकीळ गुरुजी म. न. पा. जलतरण तलावाचे जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम गोवा येथे ६ वी नॅशनल मास्टर गेम २०२४ स्विमीगच्या स्पर्धा दिनांक ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत झाल्या. या स्पर्धेसाठी १८ राज्यातून स्विमींगच्या विविध क्रीडा प्रकारात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत जळगाव शहरातील अॅक्वा स्पा कोकीळ गुरुजी म. न. पा. जलतरण तलाव येथील ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यात राहुल अभंगे (३० ते ३५ वर्षेवयोगटात) १०० मीटर बॅक स्ट्रोक -प्रथम, १०० मी. ब्रेस स्ट्रोक- द्वितीय, ५० मी.…
साईमत जळगाव प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घ्यावा साठी केंद्रीय जल आयोगाकडे सादर केला असून त्या प्रस्तावाला येत्या काही दिवसात मान्यता देण्याचे केंद्रीय जल आयोगाचे चेहरमन कुशवेंद्र वोहरा यांनी आश्वासित केल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. आज दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात जाऊन चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल यांनी भेट घेतली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये या धरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत त्यांच्याशी आज त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाची मान्यता लवकरात लवकर प्रदान केली जाईल…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेच्या बाद फेरीत चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात एमआयटी आर्ट अँड डिझाईन विद्यापीठ पुणे, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ, आत्मिय विद्यापीठ राजकोट आणि मुंबई विद्यापीठ यांनी आपआपल्या गटातील सामने जिंकले. दरम्यान, दुपारच्या सत्रात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदरा, डॉ.सुभाष विद्यापीठ, जुनागड आणि सरदार पटेल विद्यापीठ, गुजराथ हे तीन संघ विजयी झाले. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या वतीने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा दि. १८ फेब्रुवारी पासून सुरू आहेत. बुधवारी चौथ्या दिवसाच्या सकाळ सत्रात बाद पध्दतीने चार मैदानांवर चार सामने झाले. अ गटात डी. वाय पाटील विद्यापीठ पुणे…
साईमत जळगाव प्रतिनिधी मूळजी जेठा महाविद्यालयातील भौतिकशास्त्र प्रशाळेमार्फत नेट/सेट जनरल पेपर १ वर तीन दिवसीय कार्यशाळेचा आरंभ मंगळवारी झाला. सदर कार्यशाळा ही ऑफलाईन मोड मध्ये निशुल्क होत असून यात सुमारे १८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.व्ही.एस.झोपे उपस्थित होते. अध्यक्षस्थान प्रा. डॉ. के.जी.खडसे यांनी भूषविले. त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी कशा प्रकारे करावी, याची त्रिसूत्री विद्यार्थ्यांना सांगितली. मंचावर भौतिकशास्त्र प्रशाळा संचालक प्रा.डॉ.किशोर महाजन, कार्यशाळेचे संयोजक डॉ. प्रेमजीत जाधव आणि कार्यक्रमाच्या आयोजन सचिव डॉ. प्रतिभा निकम आदी उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी भौतिकशास्त्र प्रशाळा संचालक प्रा.डॉ.किशोर महाजन यांनी महाविद्यालय आणि भौतिकशास्त्र विभागाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यशाळेचे संयोजक…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहर महानगरपालिका जळगाव दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत शहरस्तर संघ व्यवस्थापन प्रक्षिशण आपल्या महापालिकेत घेण्यात आले. प्रक्षिशणास शहरातील विविध भागातील महिला वस्तीस्तर संघातील महिलासाठी तसेच समुह संसाधन व्यक्ती (CRP) व शहर स्तर संघाच्या सदस्य यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्याटनाप्रसंगी महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजनाने करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावीक शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी केले, तसेच योजनेची माहिती मानसी भापकर यांनी केली. कार्यक्रमात ११० महिला उपस्थीत होते. उपस्थित महिलांना दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान होत आहे. बुधवारी सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी जळगाव शहरात ९ तर जिल्ह्यात ७८ परीक्षा केंद्र आहे. सकाळी १०.३० वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश देण्यात आला होता. ११ वाजता पेपरला सुरुवात झाली. या परीक्षेला जिल्ह्यातील ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत. पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर असून जळगाव जिल्ह्यात ४८ हजार २७३ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत. बारावी बोर्डाची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली. या परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे.…