साईमत जळगाव प्रतिनिधी
इकरा युनानी मेडिकल कॉलेज मधील २०१८ बॅच चे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे BUMS पदवी अभ्यासक्रम पुर्ण केले त्यांची पदवी वितरण समारंभ महाविद्यालयात नुकताच उत्साहात झाला. यावेळी ४९ विद्यार्थ्याना BUMS पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अब्दुल अजीज सालार, अमिनुद्दिन बादलीवाला, नबी दादा बागवान, तारीक अन्वर, रमीज बाद्लीवाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार म्हणाले की, नव्याने पदवी घेतलेल्या डॉक्टरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा, आपण आता पर्यंत करत असलेल्या महेनतीचे फळ आहे, आज तुम्ही समाजात डॉक्टर म्हणुन ओळखले जाणार आहात. आपण त्या प्रमाणे समाजात आपले स्थान निर्माण करावे, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. डॉक्टरी पेशा फक्त पैसे कमवणेसाठी नाही तर ती एक सेवा आहे.
ते पुढे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरु केले आहे. सदरची बॅच ही २०१८ मध्ये प्रवेशित असुन कोविड १९ ला सामोरे गेलेली आहे. कोविड १९ मध्ये बियुएमएस डॉक्टरांनी खुप मोठे कार्य केले असल्याचे त्यांनी सागिंतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले. कर्यक्रमाचे यशस्वीतेसाठी इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.