साईमत जळगाव प्रतिनिधी
माती, पाणी, इतिहास आणी छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वोत्तम संस्कार आहे. अशा स्पर्धा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये मदत करतात असे प्रतिपादन माजी महापौर अश्विन सोनवणे यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भाऊंच्या उद्यानासमोरील परिसरात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २१ शाळांचे ४२ संघ व २३७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत मुलींची लक्षणीय उपस्थिती होती. या स्पर्धेला शाळा व मुलांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे भाऊंच्या उद्यानासमोरील परिसर गजबजलेला होता.
दरम्यान, माजी महापौर अश्विन सोनवणे यांनी स्वतः किल्ला बनवण्याच्या प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला, त्यांच्या हातून किल्ला बनवला हेच या स्पर्धेचे उद्घाटन व वैशिष्ट्य ठरलं. या प्रसंगी विनोद देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठाचे विनोद पाटील, खुशाल चव्हाण, समीर जाधव, फहिम पटेल, विकास मराठे, आदि उपस्थित होते.
प्रस्ताविक व भूमिका शंभु पाटील यांनी मांडली. मुलांनी माती, रेती, मुरूम, खडी, विटांचे तुकडे हे सगळं मिळून अतिशय सुंदर अशा प्रतिकृती या ठिकाणी उभ्या केल्या होत्या. हे प्रदर्शन दि.१६ ते १८ असे तीन दिवस जनतेसाठी खुले ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल शाळा व मुलांचे समितीचे अध्यक्ष कुलभुषण पाटील, उपाध्यक्ष एजाज मलिक, नंदू अडवाणी, कार्याध्यक्ष जयश्री महाजन, पुरुषोत्तम चौधरी यांनी आभार मानले.