छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाला जगण्याचा मंत्र दिला – बापुराव पानपाटील

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही तर माणसाला जगण्याचा मंत्र दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले. त्यात त्यांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना करुन गरीब जनतेला न्याय मिळवून दिला. जीवनातील प्रत्येक प्रसंगाना ते धैर्याने समोरे गेले, कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. असे प्रतिपादन बापुराव पानपाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड, पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद बागुल,डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर बोलतांना डॉ. सत्यजित साळवे यांनी महाराजांचे विश्वासू साथीदार शिवाजी काशीद यांचा प्रसंग कथन केला. ते म्हणाले की, शिवाजी काशिद, बर्हिजी नाईक, तानाजी मालुसरे या लोकांना काही मोठा खजिना मिळाला नाही. पण त्यांना प्रेम मिळाले, प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यांनी कुणालाही उघड्यावर पडू दिले नाही. हा संदेश आत्ताच्या राज्यकर्त्यांनी शिवचरित्रातून घ्यायला हवा असेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

डॉ मिलिंद बागुल यांनी सांगितले की,इतिहास म्हणजे भूतकाळाचा वर्तमान काळशी चालेला सुसंवाद असून या वर्तमान काळातही आपल्या हातून इतिहास घडत असतो. परंपरा आणि आधुनिकता सृजनांना जन्म देत असते. मात्र त्या परंपरेची जाण आणि भान आपण राखले पाहिजे. कारण चुकीचा इतिहास समाजात अंधश्रध्दांना जन्माला घालण्याचे काम करीत असतो.
सुत्रसंचालन नरेश बागडे, यांनी तर आभार विनोद निकम यांनी मानले. या प्रसंगी अजय बागडे, यशवंत पाटील, सरदार राजपुत, नारायण येवले, देविदास पाटील, विजय चव्हाण, भैय्यासाहेब बोरसे, विठ्ठल जाधव, प्रकाश जाधव, निलेश जोशी, उदय महाले, गौतमी महीला संघाच्या अध्यक्ष संगिता भालेराव, आशा बागडे, नंदिता जोशी, ज्योती निकम, योगिता पाटील, संगिता कोळी, सुनिता राजपूत, सिंधुताई जाधव, भारती जाधव, पुनम जाधव, वंदना बांगर, मंगला सोनवणे, मिना हिवाळे, सोनाली सोनावणे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here