साईमत जळगाव प्रतिनिधी मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. राज्यात महायुतीचे सरकार जोमाने काम करीत आहे. जिल्ह्यातही महायुती एकदिलाने सोबत असून आमच्या शुध्द पाण्यात कुणीही खडा टाकून पाणी दूषित करू नये. पडद्याआड राजकारण करणार्या झारीतील शुक्राचार्यांपासून सावध रहा असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना आज झालेल्या मेळाव्यात दिला. शिवसेनेचा मेळावा आज जळगाव येथे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वक्त कम है जितना दम है लगा दो, कुछ लोगोंको मै जगाता हुँ, कुछ लोगों को तुम जगा दो अशा शब्दात शेर शायरी करत पदाधिकाऱ्यांचा…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी आयएमआर महाविद्यालयातील एमबीएचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जय बागुल याची न्यू एरा एडहेसिव्ह अँड सिल्नटस् प्रा. लि. मध्ये निवड झाली आहे. त्याची ही निवड मार्केटिंग कोर्डिनेटरच्या पदावर झाली असून, त्याला वार्षिक २ लाख ६४ हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. यानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी विद्यार्थी जय बागुल याचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. या वेळी संचालक डॉ.पवार यांच्यासह पुनीत शर्मा, डॉ.निशांत घुगे, डॉ.पराग नारखेडे, डॉ.ममता दहाड आदी उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी ‘ठाणांग सूत्र’ आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार आलेला आहे. आपण वाचन संस्कार जपले पाहिजे, असे आवाहन आचार्यभगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी केले. ‘संपर्क’, ‘सहवास’, ‘सान्निध्य’ आणि ‘संबंध,’ ‘प्रेम’, ‘प्रेरणा,’ आणि ‘प्रोत्साहन’ संकल्पना ‘ठाणांग सूत्र’ आगम वाचना शिबीरात सरस्वती लब्धप्रसाद, विपुल साहित्य सर्जक, पद्मभूषण पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी अत्यंत सोप्या भाषेत श्रावक – श्राविकांना समजावून सांगितल्या. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा दुसरा दिवस होता. या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार आहे. या सहाव्या शिबिरात गुजरात, मध्यप्रदेश आणि…
साईमत जळगाव प्रतिनिधी दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती. त्याचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता हा असून या औचित्याने शनिवार दि. ६ रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “इनोव्हेशन, आयपीआर अँड हेल्थ केअर” तसेच “स्ट्रेस फ्री लाईफ” या विषयांवर पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिनामित्त भारतीय जनता पार्टी, जनसंपर्क कार्यालय जी.एम.फाउंडेशन व “वसंत स्मृती” कार्यालय, बळीराम पेठ या ठिकाणी वयोवृध्द कार्यकर्ते नारायण चौधरी (वय ९४) यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जी. एस. ग्राउंड समोरील नूतन जीएम फाउंडेशन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या पहिल्या ध्वजारोहणाचा मान भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण चौधरी रा. चांगदेव यांना मिळाला. काल रात्री त्यांना ध्वजारोहणाचं आमंत्रण मिळाल्यानंतर शनिवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता बसने प्रवास करून ते ध्वजरोहन ठिकाणी वेळेवर पोहोचले. आजवरच्या पार्टीच्या खडतर प्रवासाचा त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांसमोर आढावा घेतला. तसेच आजच्या परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थाकरता वेळोवेळी होणारे…
साईमत जळगाव प्रतिनिधी आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा यांनी केले. जैन हिल्स येथे आयोजित आगम वाचना शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या औपचारिक उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथे होणारे हे सहावे शिबीर असून यात चारशेहून अधिक श्रावक-श्राविका सहभागी झालेले आहेत. जळगाव येथील आकाश प्रांगण, जैन हिल्स स्थित ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ सकाळी झाला. सर्वात आधी सेवार्थी चोरडिया-जैन परिवाराच्यावतीने अशोकभाऊ जैन यांनी ‘ठाणांग सूत्र’ ग्रंथ आचार्य विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा यांच्याकडे…
साईमत जळगाव प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मीडिया कक्षाच्या माध्यमातून ही समिती मुद्रित, दृकश्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पेड, फेक न्यूज, द्वेष व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट/बातम्यांवर बारीक नजर ठेवत आहे. तसेच राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांना समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून देण्याचे कार्य सुद्धा हीच समिती करणार आहे. निवडणुकीचा काळ असल्यामुळे आदर्श आचारसहिंता लागू झालेली असून याचा कुठेही भंग होणार नाही यासाठी हा कक्ष गंभीरपणे काम करीत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार…
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राचे विद्यार्थी लुधियाना (पंजाब) येथील युवक महोत्सवात चमकले. या विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमार्फत या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, ओजस्विनी कला महाविद्यायाचे प्राचार्य मिलन भामरे यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला. पँशन, स्किल व नॉलेज यांच्या त्रिवेणी संगमातून उत्तम करिअर घडवता येते. कला क्षेत्रात खूप मोठी संधी आहे. या आवडीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त ज्ञान विकसित करून…
साईमत जळगाव प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री-प्रायमरीच्या लहान विध्यार्थ्यासाठी पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून पदव्या स्वरूपात प्रमाणपत्र देऊन विधीवत गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्राथमिक वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ग्रॅज्युएशन सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व प्राथमिक मधील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले. यावेळी त्यांनी नमूद केले की, कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता प्रोत्साहित करणे आहे, असे सांगत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…
साईमत जळगाव प्रतिनिधी रोटरीतर्फे जगभरात एप्रिल हा पर्यावरण महिना साजरा करण्यात येतो. या निमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे रोटरी हॉल गणपती नगर येथे निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष पर्यावरण शिक्षक प्रविण पाटील यांचे पर्यावरण आणि आपली जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष कल्पेश शाह, मानद सचिव दिनेश थोरात यांची व्यासपीठावर उपस्थित होती. प्रविण पाटील यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्वानी जबाबदारी घेऊन वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करुन प्रत्येकाने पाण्याचा जपुन वापर करुन पाणी जमिनीत जिरवणे किती गरजेचे असुन प्लॉस्टीकचा वापर कमीत कमी करावा. प्रत्येक सण साजरे करतांना पर्यावरणपुरक सण साजरे करावे एक गाव एक होळी, फटाकेमुक्त…