साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल पूर्व प्राथमिक विभागात सोमवार, दिनांक १५ जुलै, रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज भादुपोता यांचे हस्ते पालखी पूजन व ज्ञानेश्वरी पूजन करण्यात आले, त्यात पालकांनाही सहभागी करण्यात आले. यात नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका व “चल ग सखे चल ग सखे पंढरीला”,” विठ्ठल विठ्ठल”या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीत लहान मुलांसोबत वयोवृद्ध नागरिकांनी देखील ठेका धरला. “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” हा कार्यक्रमाचा विषय होता. मुला मुलींनी सुंदर वेशभूषा करून वारकऱ्यांच्या रूपात सजले होते. मुलींनी तुळशीची रोपे वाहून नेली आणि…
Author: Saimat
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन पाचोरा संघ तृतीय क्रमांकाने विजयी ठरलेत. जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १४) जुलै ला जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त विशाल बेलदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी,…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली. जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीड अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२२-२०२३ च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन दिनांक १० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी सोमवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे नमूद जाहिरातीच्या अंतिम दिनांकापूर्वीचे मुळ कागदपत्र व त्या कागदपत्रांचा छायांकित प्रर्तीचा एक संच व ०२ पासपोर्ट साईज फोटोसह कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२२-२०२३ च्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे १३७ रिक्त पदांसाठी शारीरीक चाचणी, लेखी परीक्षा, एनसीसी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन सामाजिक संमातर आरक्षण प्रवर्गनिहाय…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मनपा स्तरीय आंतरशालेय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धा चे आयोजन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या माध्यमातून करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप शनिवारी संध्याकाळी झाला. स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात अंतिम विजेतेपद मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने तर उपविजेतेपद रायसोनी इंग्लिश मीडियम ने पटकाविले. मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन सीबीएससी पोदार हा उपविजेता ठरला. तत्पूर्वी १५ वयोगटात सुद्धा पोदार विजयी ठरल्याने तिन्ही गटात पोदार विजयी ठरत तिहेरी मुकुट प्राप्त केला. विजेते उपविजेते संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस तर्फे सुवर्ण व रजत पदक प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले. पारितोषिक समारंभास…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील शेळगाव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतक-यांना लाभ होण्याच्या दृष्टीने शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या 592.01 कोटी किंमंतीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. 27 जून 2023 रोजी ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळ, जळगाव यांनी वेळोवेळी…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव येथील जीवन विमा योजना प्रतिनिधी मनोज संगीता जैन यांचे चिरंजीव संकेत जैन यांनी वयाच्या 23 व्या वर्षी सी. ए. परीक्षा प्रथम प्रयत्नात डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होत यश प्राप्त केले आहे. संकेत जैन भविष्यात actuaries करणार आहे. त्यास सीए करण काबरा, सीए पदमसिंह पाटील, महेंद्र झवर, सीए मुर्तीजा बंदूक वॉला, सीए हर्षित मालपाणी, सीए श्रुती काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. सीए संकेत यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. 10/12 वीत त्यास 95/96 टक्के मार्क्स मिळाले होते.
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव ग्रीन फाउंडेशन सिटी तर्फे देवेंद्र नगर परिसरात असलेल्या पटांगणावर पोलीस महानिरीक्षक तुरुंग विभाग डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा वन अधिकारी ए प्रवीण, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी, डॉ. धनंजय बेंद्रे, जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख, आरएफओ समाधान पाटील, मनसेचे जिल्हाप्रमुख जमील देशपांडे, हरित सेनेचे प्रविण पाटील आदींसह वृक्षप्रेमींच्या हातून १११ रोपांची लागवड करण्यात आली. या वेळेला सर्व वृक्षप्रेमी मंडळी आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कर्नल इंद्रनील अवस्थी कॅप्टन तसेच अग्निवीर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान, या सर्व रोपांची संवर्धन करण्याची जबाबदारी…
विषेश प्रतिनिधी | जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवार,22 जून रोजी जळगाव येथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ येथील आदित्य लॉनवर सभा झाली. सभेला गर्दी म्हणून आलेले शिक्षक भाड्याचे होते.या सभेनंतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने थोडीबहुत नीतिमत्ता शिल्लक असलेल्या शिक्षकांनी गरीब होऊन सभेत भाडोत्री यावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसेच संस्थाचालक यांची आज आदित्य लोन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव येथे किशोर दराडे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आले होते.यांच्या सभेनंतर जे शिक्षक आले होते, त्यांना…
साईमत जळगाव प्रतिनिधी : (हेमंत काळुंखे) आज बकरी ईद.१७ जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून बकरी ईद हा सण साजरा केला जात आहे.त्याची तयारी जळगाव शहरासह जिल्ह्यातही पूर्ण झाली आहे. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.त्यानुसार कुर्बानीची तयारी सात-आठ दिवस अगोदरच केली जाते.जळगावात शनिवारी गुरांचा बाजार भरतो त्यामुळे १५ जून रोजीच कुर्बानीचा बोकड खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी उसळल्याचे दिसून आले.सकाळी सात वाजेपासून तर…