साईमत जळगाव प्रतिनिधी
आयएमआर महाविद्यालयातील एमबीएचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जय बागुल याची न्यू एरा एडहेसिव्ह अँड सिल्नटस् प्रा. लि. मध्ये निवड झाली आहे. त्याची ही निवड मार्केटिंग कोर्डिनेटरच्या पदावर झाली असून, त्याला वार्षिक २ लाख ६४ हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
यानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी विद्यार्थी जय बागुल याचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. या वेळी संचालक डॉ.पवार यांच्यासह पुनीत शर्मा, डॉ.निशांत घुगे, डॉ.पराग नारखेडे, डॉ.ममता दहाड आदी उपस्थित होते.