साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव शहरासह गावा – गावांमध्ये विक्री आणि विपणनाशी संबंधित लोकांची बैठक नुकतीच ईदगाह मैदानाजवळील मस्जिद अरकमच्या सभागृहात पार पडली. बैठकीत सेल्स युनियनची स्थापना होऊन युनियनच्या अध्यक्षपदी मुनाफ शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत विक्री आणि विपणनाशी संबंधित सुमारे ६५ जण सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्देश व ध्येय यावर बख्तियार शेख यांनी सविस्तर प्रकाश टाकला. यानंतर सर्व उपस्थितांनी थोडक्यात आपली मते मांडली आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. एकमुखी एकमताने युनियनची स्थापना करण्यात आली. सेल्स यूनियन ची कार्यकारणी अध्यक्ष मुनाफ शेख, उपाध्यक्ष मुजाहिद खान, सचिव याकुब खान, खजीनदार आबिद शेख, उपसचिव जावेद शेख, मीडिया प्रभारी बख्तियार शेख, सदस्य…
Author: Saimat
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव पोलीस काका त्या बंदूका दाखवा ना… वॉकी-टॉकीवाल्या फोनचा काय उपयोग… अशा शेकडो प्रश्नांना उत्तरे देत पोलीस काकांनी चिमुकल्यांना पोलीस स्टेशनची अनोखी सफर घडविली. पोलिसांविषयी मनामध्ये असलेली भिती आणि त्यांच्या कामाविषयीची उत्सुकता असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कमी केली. येथे मुलांनी बंदूक जवळून पाहण्यासोबतच पोलिसांसह महिला अधिका-यांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्राथमिक विभागातील विध्यार्थ्यांसाठी कारगिल दिनानिमित्त मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, राजेंद्र उगले, प्रदीप पाटील, इश्वर लोखंडे, गणेश वंजारी,…
साईमत / न्यूज नेटवर्क / धुळे धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशीला अनावरण व भूमिपूजन समारंभ शनिवार, 27 जुलै, 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे प्रांगण, महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर, धुळे येथे संपन्न होणार आहे. नवीन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रविंद्र घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल, न्या. नितीन सूर्यंवशी, न्या. संजय मेहरे, न्या. शैलेश ब्रह्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच धुळेच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीतर्फे आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नि:शुल्क चिकित्सा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन प. पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी (ता. जुन्नर) येथे करण्यात आले होते. योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजूंना या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेता यावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुरुवातीला योग निसर्गोपचार तज्ज्ञ प्रा. सोनल महाजन यांनी निसर्गोपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. अनंत महाजन यांनी पंचमहाभूत चिकित्सा पद्धती विषयी माहिती दिली. प्रा.सोनल महाजन यांनी तपासणी करुन शिबिरार्थींना…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कवी, गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भूपेंद्र केसूर होते. उद्घाटनप्रसंगी गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली विविध गीतं गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या मराठी आणि अहिराणी या खान्देशची ओळख असलेल्या अस्सल बोली भाषेतील ठसकेबाज गीतांनी सभागृह दणाणले. व्यासपीठावर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक चौधरी, सूत्रसंचालन प्रा. योगेश…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव भारतीय मजदूर संघाच्या ७०व्या वर्षांत पदार्पणानिमीत्ताने जळगाव जिल्ह्यात विविध उद्योगात असंख्य कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगार मेळावा, घरेलू कामगारांना नोंदणी कार्ड वाटप, रक्तदान शिबिर-१०० श्रमिक रक्तदाते रक्तदान, स्वर्णिम-७० या उपक्रमाने ७० वृक्षरोपण,फलक व प्रतिमा पूजन,BMS-70 नावाचा केक कापुन व पेढे भरवून स्नेह भेट आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कामगार मेळाव्यामधे महिला भगिनी यांनी संघटनेचे ‘’मानवता के लिये उषा की,किरण जगाने वाले हम” गीत सामुहीकरित्या सादर केले. बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली तसेच कामगारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रसंगी भा.म.संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव वंदना कोलारकर…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभागात “रेड कलर डे” साजरा करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थी लाल रंगाच्या वेशात येऊन, विद्यार्थ्यांना लाल रंगाची ओळख करून देऊन. यावेळी टेबलावर सुंदर व आकर्षक लाल रंगाच्या वस्तू मांडण्यात आल्या व शिक्षकांनी सर्व वस्तूंचा परिचय करून दिला. त्याबद्दल माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख कमल सपकाळे होत्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रवीण सोनावणे, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राव उपस्थित होते.
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव येथील कै. भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्यदीप किडनी फाउंडेशनच्या संस्थापक व आयएमए जळगावचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांचा सुप्रसिद्ध किडनीविकार तज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी (संभाजीनगर) यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. १९९४ पासून दरवर्षी जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त व्याख्यानमाला व ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येतो.त्यात आजपर्यंत ८० वक्ते व ७० डॉक्टरांचा सत्कार केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयंत जहागिरदार यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, चेअरमन विनोद बियाणी, रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना डॉ.गाजरे यांनी जहागिरदार…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते. असे प्रतिपादन माजी आ. मधुभाभी जैन यांनी केले. एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे दि. २५ पासून २८ जुलै २०२४ दरम्यान होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील अक्सा नगर परिसरात शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (वय ६९ ) हे आपल्या परिवारासह रहिवासाला आहे. ते ठेकेदारी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शेख रऊफ हे महाबळकडून दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५१) ने जात होते. गजबजलेल्या आकाशवाणी चौकात आल्यावर त्यांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने…