साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
अडीच वर्षांपूर्वी राज्यात मविआचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून, हे सरकार लवकरच पडणार असे दवे भाजपाकडून (BJP) करण्यात येत होते. पण, ते खरे ठरले नाहीत. मात्र याबाबतची केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भविष्यवाणी खरी ठरली. काल (29 जून) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडले.
नारायण राणे यांनी १९ एप्रिल रोजी मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितली होती. “आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले नाही, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील” राणे म्हणाले होते. राणे यांची भविष्यवाणी खरी ठरली पण, थोडी चुकली, सरकार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न पडत, शेवटल्या आठवड्यात पडले.