यावल : तालुका प्रतिनिधी गेल्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज यावल ग्रामीण रुग्णालयात एकूण 15 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कोरोना बाधित रुग्णांना होम क्वॉरनटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात हे रुग्ण घरी क्वारनटाईन राहतील का…? असे अनेक प्रश्न जनतेत उपस्थित केले जात आहेत. काल दि.28 रोजी यावल शहरात श्रीराम नगर मध्ये 2,सुंदर नगरीमध्ये 1, बोरावल गेट परिसरात 2, नगिना मस्जिद परिसरात 1, ड़ांगपुरा भागात 1, निमगाव येथे 1, सातोद येथे 2 अशा दहा रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. आज दि 29 रोजी बोरावल गेट परिसरात पुन्हा 2, संभाजी पेठ 1, डांगपुरा एक…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गढोदा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र गोपाल सपकाळे वय ३५ असे मृत तरुणाचे नाव आहे . हा आपल्या आई, पत्नी, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्याला आहे. बँड पथकात वाजंत्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे जितेंद्र हा घरी एकटाच होता. मंगळवार २८ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गल्लीत खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जितेंद्र सपकाळे मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय…
मुंबई : वृत्तसंस्था उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. आणि अशातच शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे. किशोरी पेडणेकर यांना आलेल्या पत्रात लिहले आहे, ‘मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय.…
सोयगाव : तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) जरंडी,ता.२८…शेतात जाण्याचा रस्ताच संबंधित ठेकेदाराने बंद केल्याने रस्त्यासाठी बहुलखेड्याच्या त्या पाझर तलावात जल समाधीच्या पावित्र्यात असलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रस्त्यासाठी अखेर तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावून आम्हाला रस्ताच द्या अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार रमेश जसवंत यांचेकडे मंगळवारी ता.२८ केली आहे. बहुलखेडा गावालगत असलेल्या पाझर तलावातून असलेला शेताकडे जाण्याचा रस्ताच संबंधित ठेकेदाराने बंद केल्याने व जुना वापरता रस्ता पाझर तलावाच्या पाण्याखाली बुडत असल्याने या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने या दोनशे शेतकऱ्यांना डोक्यावर खताच्या गोण्या व खरिपाच्या पिकांचे उत्पन्न घेवून यावे लागते वेळ प्रसंगी या पाझर तलावाने पाण्याची धोकादायक पातळी गाठल्यास हा रस्ताच बंद होतो…
मुंबई : त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला ५२ आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत, अशी नाराजी शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहीतील बैठकीत व्यक्त केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी आहे. आपल्यावर भरपूर टीका झाली. आपले बाप काढले. आपली प्रेते आणण्याची भाषा वापरली. पण आमच्या जीवनाचा संघर्ष या लोकांना माहीत नाही. संजय राऊतांना आमची राजकीय वाटचाल त्यांना माहीत नाही. १९९२च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळी राऊत कुठे होते माहीत नाही. कलम…
यावल : प्रतिनिधी जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनुर धरण यावल उपविभागीय कार्यालयातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अभियंता एन.पी.महाजन हे आपल्या 38 वर्षाच्या यशस्वी प्रदीर्घ सेवेनंतर दि.30 जून2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. एन.पी.महाजन प्रथम 1984 मध्ये नाशिक येथील पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग सेवेत रुजू झाले.त्यानंतर 1987मध्ये जळगाव जिल्ह्यात मध्यम प्रकल्प विभागात हिवरा प्रकल्पात,त्यानंतर चोपडा तालुक्यात धानोरा हतनुर कालवा कार्यालयात,बुलढाणा जिल्ह्यात चिखली लघु पाटबंधारे विभागात, देऊळगाव राजा(जिल्हा बुलढाणा)खडकपूर्णा प्रकल्प विभागात,1997 मध्ये पुन्हा जळगाव जिल्ह्यात जळगाव पाटबंधारे विभागात ,त्यानंतर एरंडोल तालुक्यात गिरणा पाटबंधारे विभाग,जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रात हतनूर प्रकल्प विभागात नंतर सर्वात शेवटच्या टप्प्यात हतनुर प्रकल्पाअंतर्गत यावल उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून त्यांनी यशस्वीपणे कर्तव्यदक्षतेने आपली 38…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहे. मी आपल्या सहकारी आमदारांसह बहुमत चाचणीसाठी ते मुंबईत येणार असल्याची माहिती स्वतः शिंदे यांनी दिली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र पाठवले. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला समोर जावे लागणार आहे. कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला ३० जूना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही कारणास्तव अधिवेशन तहकुब करता येणार नाही. उद्या सकाळी ११ पासून तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रियेचे थेट…
जळगाव : प्रतिनिधी बुधवारी पहाटेच्या सुमारास नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर भयंकर अपघात झाला. जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच.४३.एडी.१०५१ व एमएच.४३.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने जात होता. सिमेंट फॅक्टरी ते डॉ.पाटील वैद्यकीय महाविद्यालयजवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमपी.०९.एजी.९५२१ ने त्यांना जोरदार धडक दिली. जिल्ह्यातील नशिराबाद येथील नशिराबादजवळ एक तिहेरी अपघात घडला असून आहे. सिमेंट फॅक्टरीच्या समोर रेल्वे पुलावर दोन मालवाहू वाहनांवर भुसावळ करून येणारा भरधाव ट्रक धडकल्याने चौघे जागीच ठार झाले मालवाहू वाहनातील नागरिक उड्डाण पुलावरून खाली कोसळले तर ट्रक उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढलेला होता. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून…
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का मनाला जातो.या घडामोडीदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स जारी केले. आज त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजार राहायचे होते . मात्र काही कारणास्तव मी आज ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात असणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये…