Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी हकेला साथ आणि गरजू रुग्णांना रक्तदानासाठी हात.. टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक सिरसाठ यांचे व सदस्यांचे उल्लेखनीय कार्य पाचोरा तालुक्यात सुरू आहे. टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष, मा.पै.जालींदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ‌‌.पै.तानाजी भाऊ जाधव, खान्देश विभाग अध्यक्ष ,पै.ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक भाऊ सिरसाठ यांचे व सदस्यांचे उल्लेखनीय कार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्याचे कौतुक होत असून या टायगर ग्रुपच्या प्रेरणादायी सकल्पनेचा सर्वाना आदर्श घेण्यासारखा आहे. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात गावात टायगर ग्रुप नावलौकिक असून या टायगर ग्रुपकडे महाराष्ट्रातील राज्याबाहेरील युवकांना याची आवड…

Read More

मुंबई : शिवसेनेत(Shivsena) झालेल्या भूकंपानंतर मागील ८-१० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. काल अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याबरोबरच अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले. ठाकरे सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. या घडामोडींदरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उतायचे नाही, मातायचे नाही, जनतेची काम करायचे. अडीच वर्षांनंतर स्थापन होणारे सरकार २५ वर्षे टिकेल. एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देऊ, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी ठरलेल्या दिवशीच घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : अडीच वर्षांपूर्वी राज्यात मविआचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून, हे सरकार लवकरच पडणार असे दवे भाजपाकडून (BJP) करण्यात येत होते. पण, ते खरे ठरले नाहीत. मात्र याबाबतची केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भविष्यवाणी खरी ठरली. काल (29 जून) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडले. नारायण राणे यांनी १९ एप्रिल रोजी मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितली होती. “आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शिवसेनेतील बंडखोरीमुळे बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीची राज्याच्या राजकारणाच चांगलीच चर्चा होत आहे. या बंडखोरीबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं असून मोठा गौप्यस्फोटही केला आहे. भाजप आणि शिंदे गट यांची आज नव्हे तर आधीपासूनच अलिखित छुपी युती होती, असा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. ‘आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता. त्याचप्रमाणे भाजपचे नेते गिरीश…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात शिवसेनेचे (Shivsena)जवळपास सर्वच आमदार सहभागी झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर सर्व राजकीय परिस्थिती बघता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यामुळे आपसूकच महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt)कोसळले. तर दुसरीकडे भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आता राज्यात भाजपाशासित सरकार येणार हे जवळपास निश्चित मानले जात असून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदावर बसणार आहे. अशातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे. राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता खरंतर ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखला…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एकनाथ शिंदे  यांच्यासोबत अनेक आमदारांने केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग होता. इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. अकोल्याचे मावळते पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे.. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्यासरकारच्या सत्तास्थापनेबाबत नवी माहिती समोर येत आहे ,फडणवीस सरकारची शपथविधी १ जुलै ला होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे  हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर भाजपाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात सत्तांतर होणार आहे. यानंतर जळगाव महापालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत आहेत. सध्या या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, यात शिवसेनेचे बनखोर नेते एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे. याआधी जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, शिवसेना नेतृत्वावर विश्‍वास ठेवत महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि सत्तेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. जळगाव महापालिकेत सत्तातंर करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले होते. भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी या नगरसेवकांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या मतदानासाठी हे बंडखोर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बुधवारी रोजी राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी “मुख्यमंत्र्यांबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांना तिळमात्र सहानुभूती नाही” असा संताप व्यक्त केला. काल रात्री साडेअकराच्या सुमारास अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत प्रतिक्रिया नोंदवली. खोपकर म्हणालेत “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचे नुकसान करणाऱ्या, राज ठाकरेंची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरेंबद्दल सतत द्वेषाचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही.” बहुमत चाचणीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

Read More