सोयगाव वनविभागाच्या वतीने वनमहोत्सव निमित्त निंबायती येथे वृक्षारोपण

0
8

साईमत लाईव्ह

सोयगाव :  तालुका प्रतिनिधी

१५ जून ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान वनमहोत्सवानिमित वन परिक्षेत्र सोयगांव प्रादेशिक अंतर्गत निंबायती ता.सोयगाव येथे सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड श्रीमती पी.पी.पवार मॅडम तसेच सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मिसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव वनपरिक्षेत्र वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक एस.एस. हिरेकर, यांच्या उपस्थीतीत ग्रामपंचायत व मोतीमाता मंदिर परिसरात गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वनरक्षक एस.एस.हिरेकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना प्रत्येकाने वृक्षारोपण करावे व वृक्षांचे प्रमाण वाढवावे असे आवाहन करीत उपस्थितांना वृक्षांचे संगोपन व वनाचे महत्व समजावून सांगितले यावेळी निंबायती सरपंच विशाल गिरी,उपसरपंच सलमान तडवी, पोलीस पाटील मूलचंद राठोड,भागचंद चव्हाण,नारायण राठोड,मा.सरपंच राजू पाटील,पुनमचंद चव्हाण, करण पवार, दिनेश जाधव यांच्यासह जरंडी वनसेवक गोविंदा गांगुर्डे,छगन झाल्टे,जाधव,कृष्णा खिरडकर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यासह गावातील इतर नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here