जळगाव :
नुकतीच जळगाव शहर शिंपी समाज श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक व सांस्कृतिक सभागृह पांझरापोळ टाकी जवळ कार्यकारणी सदस्य व समाज बांधवांची सभा झाली त्यात ६७२ वा राष्ट्रसंत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा भक्ती मार्गाने तसेच देशाच्या व समाज संस्थेच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एक समाज, एक संस्था, एक संजीवन समाधी सोहळा, (पुण्यतिथी) साजरा करण्याचा व व्यावसायिकांनी अर्धा दिवस दुकान बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला.
मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात संजीवन समाधी सोहळा साजरा करता आलं नव्हता घरोघरी समाज बांधवांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले होते परंतु कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे यावेळेस संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक सभागृह पांजरापोळ टाकीजवळ इथून महाराजांच्या पालखी व प्रतिमेची मिरवणूक सकाळी ठीक ८:३० वाजता सूरू होईल व दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन)टेलीफोन ऑफिस मागे आंबेडकर मार्केट जवळ येईल व त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमला समस्त शिंपी समाज बांधवांनी मीरोनिकित , मोठया संख्येने , उपस्थित राहून समाज ऐक्य तेचे दर्शन दाखवायचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सहसचिव दीपक जगताप का सदस्य मुकुंद मेटकर, मनोज भांडारकर, प्रशांत कापुरे, सुरेश सोनवणे, सतीश नाना पवार, दिलीप सोनवणे, रामकृष्ण शिंपी, अरुण मेटकर ,नाना कापडणे,शरद बिरारी, जितेंद्र जगताप,शैलेंद्र सोनवणे ,शरद कापुरे , किशोर निकुंभ, रमेश बोरसे,संदीप सोनवणे, बापू खैरनार, जगदीश जगताप, प्रशांत सोनवणे, जितेंद्र शिंपी, किशोर शिंपी, दिलीप भामरे, दत्तात्रय वारुळे, हेमंत शिंपी, विशाल देवरे, सुमित आहीराव, निलेश कापुरे,महेश कापुरे, गणेश सोनवणे, किरण शिंपी, मोहन सोनवणे,सुधाकर कापुरे, सुधाकरशेठ शिंपी, परेश जगताप,योगेश शिंपी, प्रमोद कापुरे ,चार्रली शिंपी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव व कार्यकरते उपस्थित होते.