जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील हरिविठ्ठल नगरमध्ये दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरमधील रेल्वे नजीक महादेव मंदिराशेजारील रहिवासी रविंद्र सुभाष दांडगे (वय 39) यांनी आपल्या मालकीची दुचाकी क्र.एम.एच.19.सी.के.2412 ही गाडी नेहमीप्रमाणे दि.5 जुलै रोजी रात्री आपल्या घराशेजारी लावली होती. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दांडगे कुटूंबिय जागे झाले तेव्हा त्यांना आपली दुचाकी गायब झालेली दिसली. दांडगे परिवाराने संपूर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही. यावरुन त्यांनी रामानंद नगर पोलिस स्थानक गाठत अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. त्याबाबत पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.