देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर !

0
2

मुंबईः प्रतिनिधी

शिंदे सरकार(Shinde Govt) अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ (Shivatirtha)येथे भेट घेऊन चर्चा केली. आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतली. शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण आहे. या भेटीत नेमकं काय बोलणे झाले, हे मात्र स्पष्ट झाले नाही.

मनसेचे आमदार राजू पाटील यांना भाजपाकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी फडणवीस राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे बोलल्या जात होते. मंत्रिपदाविषयी आमदार राजू पाटील यांनी काल (१४ जुलै) प्रतिक्रिया दिली.
राज्यात नवीन सरकार सत्तेत आले त्यावेळी राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे राज ठाकरे यांनी पत्राद्वारे नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. त्यावर प्रत्युत्तर देतांना फडणवीस म्हणाले, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांना स्वीकारून आम्ही स्वतः तुमच्या भेटीला येणार आहोत. आज फडणवीसांनी राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीमागे राजकीय संशय व्यक्त होत आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here