साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी
दिनांक २६/०७/२०२२ रोजी फर्दापुर पोलीस ठाणेचे सपोनि / डी बी वाघमोडे यांना त्याचे गुप्तबातमीदार मार्फत माहीती मिळाली की, फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रवळा शिवारातील गट क्रमांक ०९ मध्ये गांजा सारखी झाडे आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस पथकासह व राजपत्रीत अधिकारी, कृषी पदविकाधारक अधिकारी असे जाऊन सदर शेताची पाहणी केली असता शेतात असलेला शेतकरी रामचंद्र दादा शिंदे रवळा यास मिळालेल्या माहीतीची थोडक्यात हकिगत सांगीतली.
सदर शेताची सर्वांनी पाहणी केली असता इसम शेतकरी रामचंद्र दादा शिंदे याचे मालकीचे शेतात केळी पिकाच्या मधोमध गांजासारखी दोन झाडे दिसुन आली. इसम शेतकरी रामचंद्र दादा शिंदे याचे शेतातून २४ किलो २५० ग्रॅम वजनाचा एकुण किंमत १,२१, ०५०/ रुपये किंमतीचा हिरवा पाला असलेला गांजा नावाचा अंमलीपदार्थ माल जप्त करण्यात आला असून फिर्यादी सपोनि देविदास बाळासाहेब वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक फर्दापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी यांचे विरुध्द फर्दापूर पोलीस ठाणेत एनडीपीएस कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक आर. जी. कासले पोलीस उप निरीक्षक फर्दापूर पोलीस ठाणे अंतर्गत हे करीत आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, विजयकुमार मराठे यांचे मार्गदर्शनाखाली फर्दापुर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. वाघमोडे, निलेश लोखंडे,योगेश कोळी, प्रकाश कोळी,सतिष हिवाळे,पंकज व्यवहारे यांनी केली आहे.पुढील तपास करत आहे यामुळे इतर चोरून गांजा लावणाऱ्याचे शेतकऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.