कजगाव येथे महावितरण चा हम करे सो कायदा

0
3

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथे महावितरणने सक्तीच्या वसुलीने चांगलाच कहर केला असून महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दृष्ट्या बेजबाबदारपनाच्या वागणुकीमुळे ग्रामस्थांनि तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यामुळे महावीरणच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. गावात अनेक ठिकाणी कुठलीच पूर्व सूचना न देता व घरी कोणीच नसतांना सुद्धा विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे.

तसेच विद्युत वितरण कंपनीकडून नागरिकांना जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे , घरांचे व अन्य ठिकाणी वापर असलेल्या विद्युत पुरवठाचे महिन्याचे बिल थकीत असले तरी ग्राहकाला कुठलीच सूचना नदेता वीज कनेक्शन कट करण्याचा प्रकार व गोरगरिबांना वेटीस धरण्याचा प्रकार सुरू आहे , व कर्मचाऱ्यांचा हम करे सो कायदा अशीच पद्धत सुरू असून त्यांच्यावर कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्याचा धाक दिसून येत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच असून त्यांना आता लगाम घालण्याची गरज असल्याचा सुर ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्यांची जाणीव ठेवून ग्रामस्थांशी व्यवहार करावा तसेच जे कोणी अधिकारी किंव्हा कर्मचारी ग्रामस्थांशी चुकीच्या पद्धतीने वागत असतील त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोरदार होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here