बाबांच्या वाढदिवशी आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

0
3

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मातोश्रीमध्येसुद्धा शुभेच्छा देणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. मातोश्री निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली. गेटवर मध्यभागी फुलांनी धनुष्यबाण(Dhanushyaban) साकारण्यात आला आहे. तसेच मातोश्रीच्या परिसरात शुभेच्छा देणारे बॅनर्सही लावण्यात आलेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली असली तरी सामान्य शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.

अशातच ठाकरेंचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वडिलांना शुभेच्छा दिल्यात. आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत उद्धव ठाकरे गॉगल लावून, जीन्स घालून अत्यंत कुल दिसत आहेत.”माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी करत असलेली प्रत्येक गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ते मला रोजच प्रेरित करतात. तेही प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे.” अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार फोडले. आता ते संपूर्ण पक्षावरच कब्जा करत आहेत. शिवसेना आता उद्धव ठाकरे यांची राहिली नाही, आमदार-खासदारांचे बहुमत शिंदे गटाकडे आहे, अशा गोष्टी वारंवार शिवसैनिकांच्या मनावर बिंबवण्याचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. या दोघांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी एकसारखाच मजकूर ट्विट केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाअगोदर माजी मुख्यमंत्री उल्लेख केला आहे, पण शिवसेना पक्षप्रमुख ही उपाधी काढून टाकली आहे. यामधून शिंदे आणि फडणवीस यांनी शिवसेना ताब्यात घेण्याचे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाची शुभेच्छा पोस्ट टाकली आहे. यामध्ये शरद पवार यांनी ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख केला आहे. “शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! श्री. ठाकरे यांना दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना.” असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण? यावरून राजकीय संघर्ष तीव्र होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here