साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
येथील वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रस्ते कामासाठी होत असलेल्या मोजणीस अतिक्रमण धारकांनी सदर बाब न्यायालयात दाखल असल्याने त्या वर निर्णय येई पर्यंत स्थगित ठेवावी अशी मागणी करत विरोध केला होता . मात्र बराच वेळ वाद झाल्यावर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास मोजणी कामास सुरवात झाली.
बोदवड शहरातून महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडून बांधल्या जाणारा रस्ता अतिक्रमित दुकानांच्या प्रश्नामुळे रखडलाय त्या मुळे जनतेस त्रास भोगावा लागतोय. मात्र अतिक्रमण काढतांना भेदभाव केला जात असल्याच्या प्रश्नावरून धारक उच्च न्यायालयात गेले आहेत. असे असतांना एका बाजूच्या दुकानदारांना मोजणीच्या नोटीस मिळाल्यावर त्यांनी लेखी हरकत नोंदवली होती. तरी सुद्धा मोजणीस सुरवात झाल्याने विरोध होत होता मात्र पोलीस निरीक्षक मिलिंद गुंजाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन जी काही हरकत घ्यायची असेल ती कायदेशीररित्या घ्या रस्तेवर गर्दी करू नका मोजणी होऊ दया असे सांगितल्यानंतर मोजणीस सुरवात झाली. या मोजणी विरोधात न्यायालयात जाऊ असे अतिक्रमणधारकांनी सांगितले.