काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी संबोधले. यानंतर गुरुवारी भाजपच्या महिला खासदारांनी या विधानावरून सभागृहात गदारोळ केला. हातात सोनियांमागे पोस्टर घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. सोनिया गांधींना माफी मागावी लागेल, असे स्मृती इराणी म्हणाल्या. लोकसभा आणि राज्यसभेतील गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. या गदारोळात अधीर रंजन यांनी गुरुवारी संसदेबाहेर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. त्याने माफी मागण्यास नकार दिला, पण म्हणाला- चुकून मी मुर्मूला राष्ट्रपत्नी म्हटले, आता तुम्हाला मला फाशी द्यायची असेल तर द्या. सत्ताधारी पक्ष तीळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. स्मृती सभागृहात म्हणाल्या- काँग्रेस गरीब आणि आदिवासी विरोधी आहे. आपल्या चुकीबद्दल माफी मागण्याऐवजी…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी संस्कृती मंत्रालय वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभर उत्सव ठरायला हवा याच अनुषंगाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे शहरासह नागरिकांचा सहभागाचे संयोजक जिल्हाधिकारी अभिजित राऊत ‘हर घर तिरंगा’ अभियानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे, ललित कोतवाल यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ फ्रेम देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी वेदांत नाईक, तन्मय राणे, निरंजन राणे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की , आपल्या शहरामध्ये आपण ज्या घरामध्ये वास्तव्य करत आहात अशा आपल्या घरावर दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा उभारून भारताच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये ‘हर घर तिरंगा’…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी येथील वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रस्ते कामासाठी होत असलेल्या मोजणीस अतिक्रमण धारकांनी सदर बाब न्यायालयात दाखल असल्याने त्या वर निर्णय येई पर्यंत स्थगित ठेवावी अशी मागणी करत विरोध केला होता . मात्र बराच वेळ वाद झाल्यावर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास मोजणी कामास सुरवात झाली. बोदवड शहरातून महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडून बांधल्या जाणारा रस्ता अतिक्रमित दुकानांच्या प्रश्नामुळे रखडलाय त्या मुळे जनतेस त्रास भोगावा लागतोय. मात्र अतिक्रमण काढतांना भेदभाव केला जात असल्याच्या प्रश्नावरून धारक उच्च न्यायालयात गेले आहेत. असे असतांना एका बाजूच्या दुकानदारांना मोजणीच्या नोटीस मिळाल्यावर त्यांनी लेखी हरकत नोंदवली होती. तरी सुद्धा मोजणीस सुरवात झाल्याने…
IND vs WI, 3rd ODI : टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. भारताने वनडे मालिका ३-० ने जिंकली . भारतीय संघ 39 वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे आणि त्यांनी प्रथमच कॅरेबियन संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप केला आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजसमोर 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 26 षटकांत 137 धावांत गारद झाला. ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांनी त्यांच्या संघाप्रमाणे सर्वाधिक 42-42 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून युजवेंद्र…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सांगवी शिवारात येथील प्रगतीतील शेतकरी दीपक भाऊराव पाटील यांच्या कपाशी शेतात सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कपाशी पिकावरील फवारणी ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक करण्यात आले सिजेटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक रथाचे 15 जुलै 2022 पासून पुणे येथून सुरुवात करण्यात आली नाशिक संभाजीनगर जळगाव धुळे तर मध्य प्रदेशात देशभरात दहा हजार किलोमीटर प्रवास करून भारतातील सर्व भागात शेतकऱ्यांना पिकावरील ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे सिजेंटा इंडिया प्रायव्हेट कंपनी हे प्रात्यक्षिक सेवा आगामी काळात शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम करून शेतकऱ्यांचे ड्रोन दारे फवारणी करून कमी श्रमात…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला असून राज्यात सत्ता परीवर्तन निश्चित आहे, असे प्रतिपादन केले. अनेक आमदार भावनेच्या भरात शिंदे गटात गेले आहेत. 16 आमदार अपात्र ठरणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास…
अमळनेर : प्रतिनिधी येथील धुळे रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा, धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ रोजी रात्री मृत्यू झाला. धुळे-अमळनेर रस्त्यावरील स्वादिष्ट नमकीनजवळ २५ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास, ओव्हरटेक करताना चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील साडेचार वर्षांच्या बालकाच्या पाय तुटला होता. तर दुचाकीचालक चालक कैलास नंदलाल पाटील यांच्या पायाला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २६ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृत कैलास पाटील यांच्या पश्यात पत्नी, २ मुले, आई, वडील असा परिवार अाहे. जानवे येथे २७ रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ११ जुलै रोजी कसबे सुकेणे दिक्षी ओझर रस्त्यावर दिक्षी गावाजवळ रात्रीच्या वेळी हिंदुंच्या पवित्र एकादशीच्या दिवशीच कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडला व गाईची सुटका झाली ही घटना ताजी असतांनाच काल मंगळवारी रात्री साडेनऊ या सुमारास भरधाव वेगाने जाणारा टेम्पो दिक्षी जिव्हाळे शिवावर पलटी झाला आजुबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली व मदतीसाठी टेम्पो जवळ जाताच त्यात एक गाय व तीन बैल आढळले तेव्हा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले .नागरिक जमा होताच गाडीतील ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर रवींद्र धुमाळ हा नागरिकांच्या तावडीत सापडला थोडक्यात हकीकत अशी की रविंद्र सुरेश…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची समीक्षा करण्यासाठी विविध कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकींमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांपासून पोलिसांच्या घरकुलापर्यंत अनेक गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यात आले आहे. राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व…