साईमत जळगाव प्रतिनिधी शिवजयंती साजरी करताना वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी, विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्यात यावेत, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्याकडून करण्यात आले आहे. शहरासह गावांमध्ये महावितरणच्या उच्च व लघु दाबाच्या विद्युत वाहिन्या, मिनी पिलर, वीजखांब उभारलेले आहेत. अशा ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या खाली वा विद्युत यंत्रणेजवळ कार्यक्रम, रॅली, देखावे, फ्लेक्स, छायाचित्रे वा मूर्ती उभारण्यात येऊ नये. या उत्सवात विद्युत अपघाताचे विघ्न येवू नये, यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जयंतीनिमित्त कार्यक्रमस्थळी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची काळजी घेण्यात यावी. महावितरणकडून तात्पुरती अधिकृत वीज जोडणी घ्यावी. विद्युत वाहिनीच्या उंचीनुसार सुरक्षित अंतरावर फ्लेक्स, बोर्ड, ध्वज लावण्यात यावे. रोषणाईसाठी…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला आहे, या आराखड्यातून प्रत्येक विभागाच्या उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना गतिमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत. ई-ऑफिस प्रणालीचे महत्त्व नियोजन भवन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत, राजेशकुमार यांनी स्पष्ट केले की आता कागदी फाईलच्या जागी ई-फाईलच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. “प्रत्येक विभागाने आपले पूर्ण ई-कार्यालय कार्यान्वित करून नागरिकांना तत्काळ ई-सेवा उपलब्ध करून द्यावी,” असे त्यांनी सांगितले. या प्रणालीद्वारे कामकाजाची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना जलद…
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. च्या नाशिक आणि जळगावमधील मालमत्ता जप्त करण्याची महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या मालमत्तेची किंमत १.६९ कोटी रुपये आहे, असे ईडीच्या नागपूर उप विभागीय कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतून समोर आले आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. ही कंपनी दीर्घकाळापासून वित्तीय अनियमितता आणि मनी लॉन्डरिंगच्या आरोपांच्या केंद्रस्थानी होती. ईडीने या कंपनीविरुद्ध अनेक महिने चाललेल्या तपासणीनंतर ही कारवाई केली आहे. कंपनीच्या वित्तीय व्यवहारात अनेक अनियमितता आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे तपासणीतून समोर आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कंपनीने विविध वित्तीय योजना आणि लेनदेनांमधून मोठ्या प्रमाणात मनी…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत, जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दरवर्षीप्रमाणे भूजल विभागाने जिल्ह्यातील १४८७ गावांतील २५०७ पाणीस्रोतांची तपासणी केली. या तपासणीतून असे दिसून आले की अनेक जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आहे. ही गंभीर बाब समोर आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, “प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे.…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ स्थापित करण्याचे उद्दिष्ट सांगितले आहे. या मॉल्सच्या माध्यमातून महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादांना बाजारपेठ मिळवून देणे हे मुख्य ध्येय आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोषणेसोबतच आगामी वर्षांमध्ये एक करोड ‘लखपती दीदी’ बनवण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात १८ लाख ‘लखपती दीदी’ आहेत, आणि मार्चपर्यंत या संख्येत वाढ करून २५ लाख ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये १० ‘उमेद मॉल’ स्थापित करण्यात येणार आहेत. या मॉल्समध्ये महिला बचत…
साईमत सोयगाव प्रतिनिधी : तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंगळवारी रात्री कुलूप बंद प्रकरणी गुरुवारी ग्रामपंचायत सदस्यांनी व उपसरपंच संजय पाटील,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील, अमृत राठोड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली, दरम्यान २५ सी सी टी व्ही कॅमेरे असतांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप कोणी ठोकले याबाबत शोध घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ चावडा यांनी सांगितले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ विशाखा डुकरे यांच्यासह आरोग्य सेविका संगीता वानखेडे, अश्या चौघांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा बजावल्या आहे व तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली दखल जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद प्रकरणी…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघातर्फे तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तालुकास्तरीय वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जळगाव तालुक्यातील १४ शाळेतील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गोपाळ महाजन, उपाध्यक्षा अलका सपकाळे, सचिव किरण पाटील उपस्थित होते. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन, तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे उपाध्यक्ष एस. डी. भिरूड, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार उपस्थित होते. सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे सचिव विलास चौधरी, पर्यवेक्षक एल. जे. पाटील,…
पुलावर मालट्रकला मागून आलेल्या मालट्रकनेच दिली धडक नवापूर/प्रतिनिधी धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावातील सरपनी नदीच्या पुलावर रात्री दहा वाजता पुढे चालत असलेल्या ट्रकला मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चालक, सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर असे की, रात्री दहा वाजता विसरवाडी येथील सरपनी नदीच्या पुलावर पुढे जात असलेल्या मालट्रकला नागपूरहुन बारडोली जाणारा मालट्रक हा भरधाव वेगाने येत असतांना मागून जोरात धडकला. अपघातात ट्रकची कॅबीन चक्काचूर झाली आहे. कॅबीनमध्ये दोन जण अडकुन पडले होते. घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, हे.कॉ.प्रशांत पाटील, राजु कोकणी दाखल झाले. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना…
कार आणि ट्रेलरच्या अपघातात दोघे जखमी वरणगाव-भुसावळ तालुक्यातील वरणगाव-बोहर्डी गावादरम्यानच्या पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रेलच्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, राजेंद्र नथमल कोचर वय ६९ रा. भगवान महावीर मार्ग, मलकापूर जि.बुलढाणा हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शाम पुंडलीक खैरे यांच्यासोबत कार क्र.(एम.एच.२८आर. ३६३७) ने मालेगाव येथे जात असतांना वरणगाव-बोहर्डी गावाच्या दरम्यान पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र नथमल कोचर आणि त्यांच्या सोबतचे सुगमचंद उत्तमचंद आगड (दोन्ही रा. मलकापूर) हे जखमी झाले. जखमींना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.…
चाळीसगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ३२ जणांवर कारवाई, २९ हजार रोकडसह साहित्य हस्तगत चाळीसगाव – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. यातच शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ३२ जणांना अटक करण्यात आली असून २९ हजार रोकडसह जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांतर्फे मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना…