विसरवाडीला पुलावरील भीषण अपघातात दोन जण जखमी

0
20

पुलावर मालट्रकला मागून आलेल्या मालट्रकनेच दिली धडक

नवापूर/प्रतिनिधी

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावातील सरपनी नदीच्या पुलावर रात्री दहा वाजता पुढे चालत असलेल्या ट्रकला मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चालक, सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली.

सविस्तर असे की, रात्री दहा वाजता विसरवाडी येथील सरपनी नदीच्या पुलावर पुढे जात असलेल्या मालट्रकला नागपूरहुन बारडोली जाणारा मालट्रक हा भरधाव वेगाने येत असतांना मागून जोरात धडकला. अपघातात ट्रकची कॅबीन चक्काचूर झाली आहे. कॅबीनमध्ये दोन जण अडकुन पडले होते. घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, हे.कॉ.प्रशांत पाटील, राजु कोकणी दाखल झाले.

यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास नंदुरबार रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here