तोंडापूर-भारुडखेडा रोडवर आढळला मृत बिबट्या जामनेर – प्रतिनिधी तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारातील भारुडखेडा-तोंडापूर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे यांच्या गट नंबर ८२ मध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वनक्षेत्रपाल जामनेर, वनपाल, वनरक्षक गोद्री, वनरक्षक पठाड तांडा आणि वनरक्षक पिंपळगाव यांना परिसरातील नागरिकांकडून मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी सखोल चौकशी केली असता वनक्षेत्रापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळून आले. मृत बिबट्या वनपरिक्षेत्र कार्यालय, जामनेर येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे आणि इतर दोन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मृत बिबट्या साधारण ३ वर्षाचे मादी जातीचे असल्याचे त्यांनी सांगीतले. मृत बिबटच्या शरीरावर…
Author: Saimat
साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून असणारा तिढा सुटला असून या मतदारसंघातून माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने माविआच्या जळगाव शहर व जळगाव ग्रामीण च्या उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला लागली असतांना जळगाव शहरामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान जळगाव शहर…
साईमत जळगाव प्रतिनिधी चोपडा मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी गार्ड ड्युटीवर कर्तव्यावर असलेले साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा शॉल, बुके देऊन सत्कार केला. सदर प्रसंगी यावल कृषी उत्पन्न समितीचे संचालक सूर्यभान पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे सदस्य विकास पाटील यासह आदी मान्यवर उपस्थित होते जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद अहिरे यांचे नुकतेच ‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यानच्या काळात अहिरे यांची चोपडा मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी गार्ड ड्युटी लागली…
साईमत जळगाव प्रतिनिधी शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्यानिमित्ताने आज आपण जो बैलांसाठी साज देत आहोत ती एकप्रकारे बैलांप्रतीची कृतज्ञता आहे. आज यांत्रिकीकरण आलं तरी शेती मातीशी इमान असलेल्या आपल्या सारख्या बळी राजांनी आजही बैल राखून ठेवले आहेत. हीं आपल्या परंपरेची श्रीमंती आहे, ती श्रीमंती राखू या असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आसोदा येथे तुषार महाजन यांच्या संकल्पनेतून गणपती मित्र मंडळ व विविध कार्यकारी सोसायटी मार्फत आयोजित बैलांना साज वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा येथील…
साईमत जळगाव प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट व होप फाउंडेशन यांच्यातर्फे छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांच्या श्रवणशक्तीची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश भोसले यांनी हॉस्पिटलमधील नवजात बालकांची व अतिदक्षता विभागातील बालकांची ओएई तपासणी केली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर दहा हजार मुलांमागे पाच नवजात शिशु जन्मतः श्रवणदोषाने ग्रस्त आहेत. जन्माच्या पहिल्या २४ ते ४८ तासात नवजात बालकाची ओएई किंवा एबीआर स्क्रीनिंग तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग, सचिव संजय तापडिया, डॉ. मूर्तजा अमरेलीवाला, मेडिकल कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मणियार, डॉ. शीतल भोसले, डॉ. गोविंद…
साईमत जळगाव प्रतिनिधी अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालया समोर समिती तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले असता निदर्शकांना संबोधित करतांना सपकाळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमाती या स्वतंत्र म्हणून नाही तर समूह म्हणून संविधान सभेने नमूद केले आहे. त्यामुळे त्यांचे वर्गीकरण, उपवर्गिकरण करणे, त्यांना क्रिमिलेयर लावण्याचा प्रश्नच येत नाही . न्यायालयीन निर्णयामुळे या जात समूहावर…
साईमत भुसावळ प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव आचेगाव,तळवेल व पिंपळगाव येथील यात्रेकरुंची एक खाजगी ट्रॅव्हल बस नेपाळमधील तानाहुं जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील मोर्सरयांनी नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आल्याने तालुक्यासह जिल्हयावर शोककळा पसरली आहे. भुसावळ तालुक्यातील 39 यात्रेकरू पोखराहुन काठमांडूकडे निघाले होते. त्यातील जवळपास 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. भुसावळ तालुक्यातील तळवेल,पिंपळगाव,आचेगाव आणि परिसरातील 39 यात्रेकरुंना देवदर्शन आणि पर्यटनासाठी घेऊन जाणारी खाजगी बस नेपाळ येथील पोखरानजीकच्या नदीत कोसळली.या घटनेत 17 भाविकांवर मृत्यू ओढवला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यावर याबाबत मदत कार्यावर केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे व आ.एकनाथराव खडसे हे वरणगाव येथे पोहचले व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी अनुसूचित जातीची वर्गवारी करून , त्यांना क्रिमिलेयर लावून आरक्षण निश्चित करण्या बाबत राज्य शासनास अधिकार असल्या बाबतचा जो निर्णय सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे तो अनुसूचित जातीवर अन्यायकारक असून आरक्षणाची टक्केवारी त्यामुळे कमी होईल व अनुसूचित जातीत विनाकारण असंतोष निर्माण होईल तेंव्हा राज्यशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा कार्यक्रमासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होत, त्यावेळी त्यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. तसेच सर्वोच्य न्यायालयाचा…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा…या प्रमुख मागणीसह विविध मुद्द्यांचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले, सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व द्या, या प्रमुख मागणीसह विविध ९ मुद्द्यांना धरुन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा मार्फत संपुर्ण भारतात चार चरणात नियोजनबध्द आंदोलन घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी आज १३ ऑगस्ट रोजी आंदोलनाच पहिला टप्पा होता. या चरणात राष्ट्रपती महोदयांना भारतातील प्रत्येक जिह्यातील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदने देण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य घनशाम चौधरी सर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ समिती गठीत करण्यात आली आहे. समितीची बैठक दि.१२ ऑगस्ट रोजी मनपा प्रशिक्षण इमारतीतील माळा क्रमांक 13 येथे आ. राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक झानेश्वर ढेरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्याच्यानंतर समिती अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांच्या संमतीने बैठकीस सुरुवात झाली. यावेळी सदस्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन केलेल्या रजिस्ट्रेशन व छाननी केलेले अर्ज याबाबतची संपूर्ण माहिती पीपीटी द्वारे देण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या अंमलबजावणी कामी नारी शक्ती दूत मोबाईल ॲप द्वारे ऑनलाइन भरलेल्या अर्जांची संख्या व…