असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तालुकास्तरीय वकृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन

0
10

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

जळगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघातर्फे तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तालुकास्तरीय वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जळगाव तालुक्यातील १४ शाळेतील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गोपाळ महाजन, उपाध्यक्षा अलका सपकाळे, सचिव किरण पाटील उपस्थित होते.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन, तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे उपाध्यक्ष एस. डी. भिरूड, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार उपस्थित होते. सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे सचिव विलास चौधरी, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे कौन्सिल सदस्य चंदन कोल्हे, एस व्ही तायडे उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय गोपाळ महाजन यांनी केला. सूत्रसंचालन भारती पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन प्रेमराज बऱ्हाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, जी. के. भुगावड्या, कविता भोळे, मीनाक्षी कोल्हे, सचिन जंगले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धा
गट क्रमांक 1 पाचवी ते सहावी
प्रथम- माहेश्वरी कैलास राठोड
माध्यमिक विद्यालय वावडदे
द्वितीय- प्रियंका संदीप बाविस्कर महात्मा गांधी विद्यालय भादली
तृतीय – सुयश योगेश पाटील विकास विद्यालय जळगाव खुर्द
उत्तेजनार्थ – पूर्वा पुष्कराज रोटे न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद
गट क्रमांक 2 सातवी ते आठवी
प्रथम- अर्शीन पिंजारी
द्वितीय – नेहा विलास खोडपे सार्वजनिक विद्यालय असोदा
तृतीय – कोमल संजय कोळी जय हिंद विद्यालय कडगाव
उत्तेजनार्थ — दिव्या समाधान कोळी
कै अ म वारके विद्यालय विदगाव
गट क्रमांक 3 नववी ते दहावी
प्रथम- लक्षिता अरविंद चौधरी
स्वा. सै. प. ध. थेपडे विद्यालय म्हसावद
द्वितीय- तृप्ती दीपक बिऱ्हाडे सार्वजनिक विद्यालयअसोदा
तृतीय – विजय सुरेश राठोड माध्यमिक विद्यालय वावडदे
उत्तेजनार्थ – भावना अनिल सोनवणे
सरस्वती माध्यमिक विद्यालय आमोदे बुद्रुक
वकृत्व स्पर्धा
गट क्रमांक 1 पाचवी ते सहावी
प्रथम- विशाखा प्रवीण भोळे सार्वजनिक विद्यालय असोदा
द्वितीय- आरोही नितीन पाटील सार्वजनिक विद्यालय असोदा
तृतीय – सुयश योगेश पाटील विकास विद्यालय जळगाव खुर्द
गट क्रमांक 2 सातवी ते आठवी
प्रथम- मयुरेश महेंद्र धनगर स्वा. सै. प. ध. थेपडे विद्यालय म्हसावद
द्वितीय – नूतन कैलास वाणी सार्वजनिक विद्यालय असोदा
तृतीय – अजय निवृत्ती बोराडे विकास विद्यालय जळगाव खुर्द
गट क्रमांक 3 नववी ते दहावी
प्रथम- प्रज्ञा रवींद्र कापडणे सार्वजनिक विद्यालय असोदा
द्वितीय- दिव्या संजय कोळी महात्मा गांधी विद्यालय भादली
तृतीय – वैभव किशोर चौधरी महात्मा गांधी विद्यालय भादली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here