Author: Saimat

साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक मधुकर धोंडू पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातून स्थानिक मतदार संघातून रिक्त झालेल्या जागेवर अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर सहाय्यक निबंधक अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी 2 वाजता संचालक मंडळाच्या सभेत मधुकर धोंडू पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम पत्रिकेनुसार मधुकर पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. सदर अर्जास सूचकहरिश्चंद्र यादव व अनुमोदक म्हणून हिरालाल सोनवणे होते. अर्ज छाननी अंती तो योग्य असल्याने अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर यांनी मधुकर धोंडू पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले.…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ सोयगाव सोयगाव शहरापासून जवळ असलेल्या निंबा यती शिवारात शनिवारी रात्री चक्क बिबट्या ने सावज च्या शोधात मुक्काम ठोकला असल्याचे रविवारी आढळलेल्या बिबट्या च्या पावलांच्या ठशा वरून स्पष्ट झाले आहे. वनविभागाने या ठशांची छाया चित्रे तपासणी घेतले असून पंचनामा केला आहे. परिसरात शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी केले आहे. सोयगाव शेंदूरणी रस्त्यावर मुक्त बिबट्या आढळल्याचे ताजी घटना असताना शनिवारी रात्री निंबायती शेती शिवारात बिबट्या ने मुक्काम ठोकल्याचे रविवारी सकाळी आठ वाजता आढळलेल्या फूट स्टेप वरून स्पष्ट झाले आहे, निंबायती शिवारातील शेतात व बांधावर ठिकठिकाणी बिबट्या चे पायांची ठसे रविवारी आढळून आल्या चे कळताच सोयगाव…

Read More

स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या शहिदांना अभिवादन साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे गोदाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘एक शाम शहीदों के नाम’ राष्ट्रभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पहूर येथील आर.टी. लेले हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमात प्रारंभी क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या शहिदांना अभिवादन केले. स्वर गुंजन म्युझिकल ग्रुपतर्फे विविध राष्ट्रभक्तीपर गीत सादर करण्यात आले. राष्ट्रभक्तांनी सादर केलेल्या गीतांनी सारेच वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. याप्रसंगी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, गोदाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य…

Read More

साईमत / प्रतिनिधी / जळगाव “जिल्हयात मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जळगाव, मौलाना आझाद, अल्पसंख्यांक महामंडळ, जळगाव या कार्यालयांचा समावेश आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना,महामंडळे,उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव…

Read More

साईमत / प्रतिनिधी / जळगाव तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती दिल्यानंतर त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त येथे सुनावणी सुरू असतांना निकाल लावण्यासाठी लावून देतो असे सांगून ५० हजारांची मागणी करत तडजोडीअंत ३६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी…

Read More

शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण, धरण पाहण्यासाठी होतेय गर्दी साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी: बहुतांश भागात पावसाचा जोर वाढून अनेक नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने आनंद व्यक्त होत होता. मात्र, चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील २० ते २५ गावांसाठी सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या सातपुड्यातील चिंचपाणी धरणात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतरही धरणात फक्त मृतसाठा एवढे पाणी जमा झाले असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने हे धरण प्रथमच तुडूंब भरून ‘ओव्हर फ्लो’ वाहु लागल्याने शेतकरी वर्गाच्या आनंदाला उधाण आले आहे. धरण पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी होत आहे. चोपडा तालुक्याच्या पुर्व भागातील बिडगाव, मोहरद, धानोरा,…

Read More

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता साईमत/निंभोरा,ता.रावेर/प्रतिनिधी: रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सपोनि हरिदास बोचरे होते. यावेळी प्रगतीशील शेतकरी कडू चौधरी, प्रल्हाद बोंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, स.पो.नी बोचरे, स्वप्निल पाटील यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत निंभोरा येथून बदली झालेल्या पोलिसांना निरोप देण्यात आला. निंभोरा येथे प्रदीर्घकाळ सेवा बजावलेले गोपनीय विभागात कार्यरत पो.ना.का. स्वप्निल पाटील यांची बदली झाल्याने त्यांना भेटवस्तू शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते निरोप देण्यात आला. यावेळी नरेंद्र ढाके,राजीव बोरसे,सुनील कोंडे, काशिनाथ शेलोडे, ज्ञानदेव नेमाडे,राजू भोगे दिलशाद शेख मनोहर तायडे मनोज सोनार दस्तगीर खाटीक गोकुळ भोई,गजानन पाटील, सागर तायडे,…

Read More

                    एसपी राष्ट्रवादी पक्षाचा सोशल इंजिनिअरिंगचा अफलातून फार्मुला साईमत विशेष प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याच्या शरदचंद्र पवार  राष्ट्रवादी पक्षाच्या नवनियुक्त शिलेदारांचा विचार केल्यास आगामी विधानसभा निवडणूकीच्या वातावरणाच्या ऐन भरात सामाजिक समीकरणावर भर दिला आहे. पक्षाने जिल्हाध्यक्ष मराठा,रावेर लोकसभेला कार्याध्यक्ष तेली, जळगावला माळी,महानगर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मुस्लिम,दोन कार्याध्यक्ष देतांना एक राजपूत आणि एक मराठा याप्रमाणे अफलातून सोशल इंजीरिंगचा फार्मुला असा मेळ साधत गुगली टाकली आहे. मावळते जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्रभैय्या पाटील यांचा गेल्या सात वर्षाचा काळ पक्षाच्या पदरात काही ठोस पाडू न शकल्याने त्यांच्याविषयी उघड तक्रारी झाल्या.लोकसभेच्या पराभवाची कारणमिमांसा असणाऱ्या चालू सभेत तत्कालीन जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्रभैय्या…

Read More

      तिन्ही दादांच्या भांडणाचा मुद्दा निकाली निघाल्याच्या पार्श्वभूमिवर सुरु झाली चर्चा साईमत विशेष प्रतिनिधी (विवेक ठाकरे) अमळनेर नगरपालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत झालेल्या दंगलीतील खटल्यात माजी आ.शिरीषदादा चौधरी यांनी न्यायालयात साक्ष बदलली.यामुळे मंत्री अनिलदादा पाटील यांच्यासोबत त्यांचे मनोमिलन होईल,असे बोलले जात असले तरी त्यापेक्षा  आगामी विधानसभेच्या धर्तीवर गुन्ह्यात नावे असलेल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये साखर पेरणी व्हावी म्हणून शिरीषदादा चौधरी यांनी साक्ष फिरवत वेगळाच डाव टाकल्याची चर्चा पुढे येतेय.महिनाभरात त्या भांडणाच्या खटल्याचा कोर्टात फैसला होईल पण त्यानंतर बदलणाऱ्या राजकीय समीकरणाकडे व यावर नेमका विधानसभा निवडणूकीवर त्याचा कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमळनेर तालुक्याला स्थानिक भूमिपुत्र व उपरा…

Read More

येथील पालक नाल्यावर गावाजवळ जुना आहे. साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी : येथील पालक नाल्यावर गावाजवळ जुना आहे. नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यावर गावातील व धानोरासह परिसरातील नागरिकांच्या गावाशी संपर्कप्रमुख तुटतो. विशेष म्हणजे याच पुलावरून जि.प.शाळा व माध्यमिक शाळा जाण्याकरता वापर केला आहे. मात्र,याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यावर आणि वरतून पावसाची रिप्रेप सुरू असल्यावर इकडून प्रवेश करता येत नाही या पालक आल्यावर फरशी फुल बसवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. २५ हजार लोक वस्तीचे गाव असलेल्या आणि तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या धानोरा गावात पालक आल्यावर फरशी पूल बसवण्याची मागणी पुढे येत असून गावातील यांना पाणी आल्यावर पूर्णपणे गावाचा व बाहेर खेडेगावावरून येणाऱ्या लोकांचा संपर्क तुटून…

Read More